आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • UPSC 2nd टॉपर: खासगी जॉब सोडला, दीड वर्षांच्या मुलापासून दूर राहून केली तयारी DivyaMarathi Exclusive Interview With UPSC Second Topper Anu Kumari

UPSC 2nd टॉपर: प्रीमध्ये 1 गुणाने संधी गेली; जॉब सोडला, लहान मुलापासून दूर राहून केली तयारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यूपीएससीमध्ये सेकंड टॉपर ठरलेल्या अनु कुमारी. - Divya Marathi
यूपीएससीमध्ये सेकंड टॉपर ठरलेल्या अनु कुमारी.

सोनिपत - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे शुक्रवारी निकाल जाहीर झाले. यात सोनिपतच्या अनु कुमारी यांनी पूर्ण भारतातून दुसरे स्थान पटकावले. मूळच्या पानिपतमधील दिवाना गावच्या रहिवासी बलजित सिंह यांच्या कन्या अनु कुमारी यांच्या यशामुळे पूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. जयपूर गोल्डन हॉस्पिटल दिल्लीतून सेवानिवृत्त वडील बलजित सिंह, आई संतरा, मुले विनीत आणि नितीन सर्वांना या यशाचा अमाप आनंद झाला आहे. दिव्य मराठीशी खास मुलाखतीत त्या म्हणाल्या की, यूपीएससीमध्ये सेकंड टॉप करण्याआधी त्यांची प्री एका गुणाने हुकली होती. याच्या तयारीसाठी त्यांनी खासगी नोकरी सोडली आणि दीड वर्षांच्या मुलापासून दूर राहून तयारी करून हे यश मिळवले.  

 

Q. तुम्हाला आयएएसची तयारी करावी असे केव्हा वाटले?

A. इच्छा तशी बालपणापासूनच होती, परंतु गुड़गावमध्ये काही वर्षे जॉब केल्यानंतर असे वाटू लागले की, काहीच नवीन होणार नाही, जॉब करत असताना काहीच करू शकणार नाही, म्हणून जॉब सोडला. मग फक्त दीड महिन्यांच्या तयारीच्या आधारावर प्री एक्झाम दिली, परंतु एका गुणामुळे संधी हुकली.

Q. मग स्वत:ला कसे तयार केले?

A. मी स्वत:ला मानसिकरीत्या तयार केले. जेव्हा दीड महिन्यात एवढी यशाजवळ जाऊ शकते, तर आणखी मेहनत घेऊन यश नक्कीच मिळवू शकणार होते.

Q. सर्वात मोठी अडचण काय होती, ती कशी दूर केली?

A. अडचण काहीच नाही, पूर्ण लक्ष फक्त यावरच द्यायचे होते. यामुळेच मुलाला माझ्या आईकडे सोडले आणि स्वत: माझ्या मावशी नीलम यांच्याकडे राहून अभ्यास केला. मला माझ्या पतीपासून ते घरातील सर्वांचा पूर्ण पाठिंबा होता.

Q. लहान मुलाला सोडून अभ्यास करणे किती अवघड होते?

A. खूपच अवघड होते. पण कुटुंबीयांनी पूर्ण पाठिंबा दिला, मला सतत प्रोत्साहन दिले. पण आईच शेवटी, आठवण आली की खूप व्याकूळ व्हायचे. परंतु लक्ष्य ठरलेले होते, त्यामुळे मागे हटू शकत नव्हते.

Q. तयारी कशी केली?

A. सेल्फ स्टडीवरच भर होता. कोचिंग क्लासेसच्या भरवशावर नाही राहिले. दिल्ली विद्यापीठातून बीएस्सी केली होती, बऱ्याच विषयांची माहिती होती. यानंतर मी ऑनलाइन स्टडी केली. स्पेशल टॉपिक बनवून त्याचा अभ्यास केला. अभ्यासही स्टेप बाय स्टेप केला. यामुळे अडचण आली नाही.

Q. देशभरातून दुसरी रँक मिळेल, याचा विश्वास होता?

A. यशाची तर पूर्ण खात्री होती, पण रँकबाबत विचार केला नव्हता. खूप चांगले वाटतेय, देशभरातून दुसरी रँक मिळाल्याबद्दल.

Q. आता यश मिळाले आहे, काय भावना आहेत?

A. हेच की, चांगले प्रशिक्षण घेऊन, जे काम मिळेल, ते पूर्ण प्रामाणिकपणे आणि निष्ठेने करीन.

Q. हरियाणाबद्दल तुमचा काय विचार आहे?

A. हरियाणा एक उभरते राज्य आहे, परंतु सर्वात मोठी समस्या म्हणजे महिला-मुलींविरुद्ध वाढलेले गुन्हे, हे देशाची प्रतिमा मलिन करतात.

Q. अशा स्थितीत असे काय केले जावे, ज्यामुळे परिस्थितीत सुधारणा होईल?

A. सर्वात आवश्यक आहे की, इतरांकडून अपेक्षा करण्याऐवजी आधी स्वत:ला एक उदाहरण म्हणून सादर करावे लागेल. नुकतेच मानुषी छिल्लर आणि खेळांमध्ये मुलींनी पूर्वेत असे केले आहे आणि भविष्यातही मुली असे करतीलच. यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर संपूर्ण विश्वास ठेवला पाहिजे.

Q. आपल्या यशाचे श्रेय कुणाला द्याल?

A. माझ्या कुटुंबीयांना. त्यांनी नेहमी माझ्या निर्णयात माझी साथ दिली. कधीच धीर खचू दिला नाही. पुढे होऊन प्रत्येक अडचण दूर करण्यात माझी मदतच केली.

Q. जे तरुण या दिशेने पुढे जात आहेत, त्यांना काय संदेश द्याल?

A. हाच की, जीवनात एक लक्ष्य जरूर असावे, काही असे की, ज्यामुळे स्वत:सोबतच आपल्या समाजासाठीही काही करू शकाल. कोणतेही लक्ष्य तोपर्यँत कठीण असते, जोपर्यंत तुम्ही पूर्ण प्रामाणिकपणाने ते मिळवण्याचा प्रयत्न करत नाहीत. लक्ष्यासाठी निरंतर प्रयत्न करा, अपयशालाही यशाची एक पायरी समजून स्वत:वरचा विश्वास ढळू देऊ नका.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...   

बातम्या आणखी आहेत...