आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन वर्ष वेदान सहन करत होती महिला, पोटात निघाला अर्धा मीटर टॉवेल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरा (बिहार) - डॉक्टरच्या निष्काळीजपणामुळे एका महिलेला दोन वर्ष त्रास सहन करावा लागला. या दरम्यान तिला अनेक प्रकारचा त्रास झाला. झाले असे की दोन वर्षापूर्वी ब्रह्मपूर येथे महिलेच्या पोटाचे ऑपरेशन करण्यात आले होते. तेव्हापासून महिलेला पोटाचा त्रास सुरु झाला होता. दोन वर्षात विविध डॉक्टरांकडे खेटे मारून आणि औषधोपचार करुनही महिलेचा त्रास कमी झाला नाही. सोमवारी महिला आणि तिचा पती आरा येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये आले, येथे महिलेचे पुन्हा ऑपरेशन करण्यात आले. तेव्हा तिच्या पोटातून अर्धा मीटर टॉवेल निघाला. ऑपरेशन करणारे सर्जन डॉक्टर एस.पी. श्रीवास्तवर देखील हे पाहून चकित झाले. आता महिलेचा त्रास थांबला आहे. तिच्या कुटुंबियांनी ब्रह्मपूर येथील डॉक्टरविरोधात कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. 

 

महिलेच्या पोटात निघाला अर्धा मीटर टॉवेल 
- डॉ. श्रीवास्तव म्हणाले, उर्मिला देवीच्या पोटातून अर्धामीटर टॉवल काढण्यात आला आहे. टॉवेल रक्ताने माखलेला हकोता. 
- महिलेच्या पोटात कपडा अडकलेला असल्याने तिला पोटदुखीचा आणि इतर त्रास होत होता. आता महिलेची प्रकृती स्थीर आहे. 
- याआधी महिलेवर कोणी ऑपरेशन केले हे माहित नसल्याचे सांगत डॉ. श्रीवास्तव म्हणाले, ऑपरेशनच्या वेळेस सावधानता बाळगली पाहिजे. 

 

अल्ट्रासाऊंडनंतर घेतला ऑपरेशनचा निर्णय 
- उर्मिला देवी दोन वर्षांपूर्वी पोट दुखीच्या त्रासाने ग्रस्त होत्या. त्यानंतर कुटुंबियांनी त्यांना ब्रह्मपूर येथील एका क्लिनिकमध्ये दाखवले होते. तिथे त्यांच्यावर मोठे ऑपरेशन करण्यात आले. 
- ऑपरेशननंतरही पोटाचा त्रास थांबला नाही, उलट त्रास वाढला होता. त्यांनी पुन्हा डॉक्टरची भेट घेतली तेव्हा, त्रास कमी होईल एवढेच त्याने सांगितले. 
- मात्र त्रास काही कमी झाला नव्हता. त्यानंतर महिलेने बक्सर आणि ब्रह्मपूर येथील अनेक डॉक्टरांकडे दाखवले, परंतू एकाही डॉक्टरकडे त्यांचा त्रास कमी झाला नाही. यात दोन वर्षे निघून गेली. 
- गाव आणि कुटुंबातील लोक तर कामाचा कंटाळा येत असल्यामुळे उर्मिला देवी आजारपणाचे नाटक करत असल्याचे देखील म्हणायला लागले होते. 
- सोमवारी उर्मिला देवी आणि तिचे पतीने डॉ. श्रीवास्तव यांची भेट घेतली. डॉक्टरांनी तिचे अल्ट्रासाऊंड चेकअप केले, परंतू त्यात काहीही स्पष्ट झाले नाही. त्यानंतर ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. 
- ऑपरेशन सुरु झाले आणि उर्मिला देवीच्या पोटात अर्धा मीटर टॉवेल असल्याचे त्यांना आढळले. रक्ताने माखलेला टॉवेल त्यांनी बाहेर काढला. 

बातम्या आणखी आहेत...