आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑपरेशन केल्यावर डॉक्टरांनाही बसला Shock, महिलेच्या पोटातून काढल्या 300 जिवंत कृमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धनबाद (झारखंड) - साडेतीन वर्षांपासून नेहमी पोटात दुखत राहायचे. उलट्यासुद्धा व्हायच्या. परंतु उपचारांदरम्यान जेव्हा ऑपरेशन करण्यात आले, तेव्हा डॉक्टरांनाही जबरदस्त धक्का बसला. दीड तास चाललेल्या सर्जरीमध्ये रुग्ण महिलेच्या पोटातून एक-एक करून 10-10 इंचांच्या 300 हून जास्त जिवंत कृमी (राउंड वर्म) काढण्यात आल्या. एवढेच नाही, डॉक्टरांनी आतड्यांमध्ये आणखी कृमी असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. ही घटना धनबादच्या लोयाबादची आहे. येथील रहिवासी 25 वर्षीय अंशु दास या महिलेला पोटदुखीचा त्रास होता. तिच्यावर शुक्रवारी ऑपरेशन करण्यात आले.

 

आश्यर्चकारक घटना

डॉक्टर या घटनेला धनबादमधील पहिले प्रकरण असल्याचे सांगत आहेत. चकित करणारी बाब म्हणजे एक्स-रे आणि अल्ट्रासोनोग्राफीतही महिलेच्या पोटात एवढ्या मोठ्या संख्येने कृमी असल्याचे दिसले नव्हते. मेडिकल रिपोर्ट दाखवत नर्सिंग होमचे संचालक डॉ. जयप्रकाश खेतान सांगितले की, महिलेच्या सर्व रिपोर्ट नॉर्मल होत्या. सर्जरी करणारे डॉ. रामलखन प्रसाद म्हणाले की, ही आश्चर्यकारक घटना आहे. सेंट्रल हॉस्पिटलमधून निवृत्त झालेले डॉ. प्रसाद म्हणाले की, वैद्यकीय शिक्षणादरम्यान अशी एक केस पाहण्यात आली होती.

 

डिलिव्हरीनंतरच्या वेदना समजून दुर्लक्ष करत राहिली
अंशु दास म्हणाल्या की, साडेतीन वर्षांपूर्वी त्यांना पहिली मुलगी झाली होती. त्यानंतर नेहमीच त्यांचे पोट दुखत होते. वाटले होते की, डिलिव्हरीनंतर अशा वेदना होतच असतात. वेदना वाढायला लागल्यावर केमिस्टकडून औषध आणून त्यावर भागवायचे. काही दिवसांपूर्वीच सासरहून माहेरी आले. तेथील डॉक्टरांना दाखवले, अनेक तपासण्या केल्या, सर्वच रिपोर्ट नॉर्मल आले. मग प्रगति नर्सिंग होमला रेफर कण्यात आले.

 

तोंडातूनही निघाल्या 10 ते 12 कृमी
रुग्णाचे पती चंद्र पासवान म्हणाले की, पोटदुखी आणि उलट्या झाल्याने 17 जुलैला अंशु प्रगती नर्सिंग होममध्ये भरती झाल्या. तेथे उलट्या होऊन तोंडातून 10 ते 12 कृमी निघाल्या. मग रुग्णाचे पोट फुगू लागले, म्हणून सर्जरी करण्यात आली.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या घटनेचे आणखी Photos...

 

बातम्या आणखी आहेत...