आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Investigation:हजारीबागमधील संपूर्ण कुटुंबाची हत्या झाल्याची शक्यता, 8 पुराव्यांमुळे संशय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हजारीबाग - येथील खजांची तलाव परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये शनिवारी रात्री एकाच कुटुंबातील 6 जण  मृतावस्थेत आढळले. अग्रवाल समाजाचे महामंत्री सह कार्यकारी अध्यक्ष आणि ड्राय फ्रूट्सचे ठोक विक्रेते 70 वर्षीय महावीर माहेश्वरी यांचे होते. हे कुटुंब फ्लॅट नंबर 303 आणि 304 मध्ये राहत होते. 


कुटुंबातील सर्व सदस्यांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी मिळाले. फ्लॅट नंबर 303 च्या डायनिंग हॉलच्या सोफ्यावर महावीर माहेश्वरी यांची 7 वर्षीय नात अन्वी उर्फ परीचा मृतदेह होता. सोमरच्या खोलीत दिवाणावर 10 वर्षीय नातू अमनचा मृतदेह होता. त्याचा गळा कापला होता. त्याच खोलीत महावीर माहेश्वरीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता. शेजारच्या खोलीत महावीर यांच्या पत्नी 65 वर्षीय किरण माहेश्वरी यांचा मृतदेह पंख्याच्या हूकला लटकलेला होता. जवळ दिवाणावर 35 वर्षीय सून प्रीती अग्रवालचा मृतदेह होता. तर अपार्टमेंटच्या खाली मेनगेटवर महावीर यांचा  40 वर्षीय मुलगा नरेश अग्रवाल याचा मृतदेह होता. मृताचा लहान भाऊ सावरमल माहेश्वरी यांनी सांगितले की, महावीर यांच्यावर 70 लाखांचे कर्ज होते. हा पैसा बाजारात अडकला होता. त्यामुळे ते तणावात होते.  


या 8 पुराव्यामुळे आहे कट रचल्याचा संशय 
1. फांशीनंतर मानेचे हाड तुटल्याने मान उजवीकडे किंवा डावीकडे झुकलेली असते. पण याठिकाणी मान मागच्या बाजुला झुकलेली होती.
2. जीवंत व्यक्ती वरून खाली पडली तर त्याचे डोके आदळून रक्त येते. पण नरेशच्या डोक्यावर जखम नाही. त्याचा एक हात तुटला होता आणि दोन्ही तळ पायांवर छिद्राच्या खुणा होता. जमीनीवर रक्तही नव्हते. 
3. 15 दिवसांपूर्वी एका अपघातात मणक्याला दुखापत झाल्याने त्यांना पायऱ्या चढता येत नव्हत्या. मग ते छतावर कसे गेले? 
4. मृतदेहांमधून अत्तराचा सुगंध येत होता. म्हणजे बेशुद्ध करून हत्या केलेली असावी. गळा कापल्यानंतर ब्लेड बेसिनमध्ये धुतले. आत्महत्या असती तर पुरावे कशाला मिटवले असते? 
5. ज्या खुर्चीवर चढून फाशी घेण्यात आली ती पुढच्या बाजुला होती. पण खुर्ची तर मागच्या बाजुला पडायला हवी होती. शिवाय लुंगीला रक्त कसे लागले हाही प्रश्न आहेच?
6. पोलिसांनी सांगितले की, प्रीतीने फाशी घेतली आणि नंतर मृतदेह खाली काढून किरणने फाशी घेतली. पण जर प्रितीला बेशुद्ध केले असेल तर तिने फाशी कशी घेतली?
7. एकूण 6 सुसाईड नोट आढळल्या मग त्या सर्व एका ठिकाणी का ठेवलेल्या नव्हत्या? 
8. सुसाइड नोटमध्ये तीन पद्धतीचे लिखाणि आणि तीन रंगांचा वापर का केला?


नीकटवर्तीय म्हणतात आत्महत्या करणे अशक्य 
डॉक्टरांच्या मते, ज्याप्रकारे मृत्यू झाले ते पाहता कुटुंब मानसिकदृष्टा विकृत असेल तरच ते शक्य आहे. कुटुंबाचे  नीकटवर्तीय सत्यनारायण अग्रवाल यांनी सांगितले की, शनिवारी रात्री 8 वाजता महावीर यांच्याशी चर्चा झाली होती. सर्वकाही नॉर्मल वाटत होते, ते आनंदी होती. त्यामुळे आत्महत्या करणे अशक्य वाटते. या प्रकरणी पोलिसांची आतापर्यंतची थेअरी अशी आहे की, नरेशने दोन्ही मुलांची हत्या करून छतावरून उडी मारून आत्महत्या केली. एसपी मयूर पटेल यांनी सांगितले की, नरेशवर हत्येचा गुन्हा दाखल केला जाईल. पण नरेशचा मृत्यू आत्महत्या असल्याचे मान्य करायचा तज्ज्ञ तयार नाहीत. 


पॉवर ऑफ अटॉर्नी ज्याच्या नावावर त्याच्यावरही संशय 
खोलीतून जप्त करण्यात आलेल्या पॉवर ऑफ अटॉर्नीमध्ये लिहिले आहे की, आमच्या मृत्यूनंतर फ्लॅट मालक उमेश साव हे एलआयसी ईएमआयचा भरणा करतील. त्याच अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावर राहणारे उमेश साव म्हणाले की, याबाबत त्यांना काहीही माहिती नाही. पोलिसांनी मात्र उमेश साव यांचा या प्रकरणाशी काय संबंध याचा तपास सुरू केला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...