आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉटेलातून 67 चिमुकल्या मुलींची सुटका, सगळ्याच मुली रेपचा आरोपी दातीच्या आश्रमातून!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजसमंद - राजस्थानच्या या शहरातील सुभाषनगर पीर बावजी परिसरात असलेल्या हॉटेल राजमहलातून 67 मुलींची सुटका करण्यात आली आहे. पोलिस आणि बाल कल्याण समितीने बुधवारी दुपारी ही कारवाई करून सर्वच अल्पवयीन मुलींना बालिका गृहात रवाना केले आहे. रेपचा आरोपी असलेल्या दाती महाराजच्या आश्रमातून एका रात्रीत मुली गायब झाल्याची माहिती या समितीला मिळाली होती. सुटका करण्यात आलेल्या सर्व मुली कांकरोली येथील आध्यात्मिक गुरुमुख स्कूलच्या आहेत. तसेच त्या आश्रमात आध्यात्मिक शिक्षण घेत होत्या असे सांगितले जात आहे. रेजिस्ट्रेशनसह अनेक कागदपत्रांवरून आश्रम संचालकावर संशय व्यक्त केला जात आहे. हॉटेल संचालकाच्या भूमिकावर सुद्धा शंका व्यक्त केली जात आहे. 


विविध राज्यातील मुली...
सुटका करण्यात आलेल्या अल्पवयीन मुली झारखंड, आसाम, मध्यप्रदेश, कर्नाटक, छत्तिसगड आणि दिल्लीसह नेपाळच्या आहेत. या सर्व मुलींना त्यांच्या आई-वडिलांच्या मर्जीने आश्रमात पाठवण्यात आले होते का हे सुद्धा अद्याप स्पष्ट झाले नाही. कथित आश्रमात या मुलींनी आध्यात्मिक शिक्षण घेतले आहे. काउन्सलिंग करून त्यांची सविस्तर चौकशी केली जात आहे. 


पत्र्याखाली लपवल्या होत्या मुली...
हॉटेललाच आश्रम बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यासाठी हॉटेलच्या छतापासून खिडक्या आणि बालकनी सुद्धा पत्रे लावून सील करण्यात आले होते. बाहेरच्या लोकांनी आतील काहीच पाहू नये अशी व्यवस्था करण्यात आली होती. अर्थातच या मुलींना लपवून ठेवण्यात आले होते. पोलिस आणि प्रशासनाने अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती जाहीर केली नाही. परंतु, आश्रम आणि हॉटेल संचालक या दोघांवर संशय व्यक्त केला जात आहे. त्या मुलींपैकी एकीचेही नाव रेजिस्टर किंवा कागदपत्रांवर नमूद नाही.

 

बातम्या आणखी आहेत...