आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • भारतात येऊन तणावमुक्त व्हायचे होते विदेशी तरुणीला, नराधमांनी रेप करून चिरला गळा Druged, Rap*D, Beheaded, Foriegner Who Came India To Cure Depression Murdered

भारतात येऊन तणावमुक्त व्हायचे होते विदेशी तरुणीला, नराधमांनी रेप करून चिरला गळा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरुवनंतपुरम (केरळ) - तणावमुक्त होण्यासाठी एक विदेशी तरुणी भारतात आली. येथे काही दिवस तिला शांततेत घालवायचे होते. परंतु नराधमांनी रेप करून तिची हत्या केली. ही घटना केरळ राज्यातील थिरुवल्लमच्या जंगलांमध्ये घडली. पोलिसांना येथे 21 एप्रिल रोजी एका विदेशी तरुणीचा मृतदेह आढळला होता. यानंतर डीएनएवरून कळले की, ही विदेशी तरुणी युरोपियन देश लाटव्हियाची रहिवासी होती. मृत तरुणीसोबत आलेल्या तिच्या बहिणीनेही मृतदेहाची ओळख पटवली आहे. 

 

दोन हिस्ट्रीशीटर ताब्यात...
- पोलिसांनी याप्रकरणी दोन हिस्ट्रीशीटरना अटक केली आहे. आरोप आहे की, या दोघांनीच तरुणीला ड्रग्ज देऊन तिच्यावर रेप केला. नंतर पीडितेने जेव्हा विरोध केला, तेव्हा तिची गळा चिरून हत्या केली. 

 

तणावग्रस्त होती तरुणी
- 33 वर्षीय लीगा तणावग्रस्त होती. ती याच वर्षी फेब्रुवारीत तिरुवनंतपुरममध्ये आली होती, येथे एक आयुर्वेदिक थेरपी सेंटरवर ती उपचार घेत होती. मार्चमध्ये ती कोवलम बीचवर गेली होती, यानंतर मात्र ती बेपत्ता झाली. पोलिसांच्या मते, विदेशी तरुणीला उदयन (24) आणि उमेश (28) यांनी ड्रग्ज देऊन तेथून काही अंतरावर असलेल्या दलदलीच्या परिसरात नेले. येथे त्यांनी तिच्यावर बलात्कार केला, मग गळा चिरून हत्या केली.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित फोटोज..

बातम्या आणखी आहेत...