आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Crime: पत्नीची हत्या करून घराबाहेर पडला दारुडा पति, संतप्त जमावाने केला चेंदामेंदा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गया - बिहारमध्ये सासाराम येथे संतप्त गावकऱ्यांनी एका दारुड्या हत्येच्या आरोपीला बेदम मारहाण करून ठार मारले. विश्रामपूर टोला रहिवासी असलेल्या एका व्यक्तीने दारुच्या नशेत आपल्या पत्नीला रॉडने मारहाण केली. याच मारहाणीत तिचा मृत्यू झाला. गावकऱ्यांना ही गोष्ट कळाली तेव्हा ते इतके संतापले की त्यांनी आरोपीला चोहीकडून घेरले. यानंतर त्याला इतकी बेदम मारहाण केली की त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. 


पोलिस तपासावरही लोकांना संशय

पोलिसांनी प्राथमिक चौकशीत पति-पत्नीच्या भांडणात पत्नीचा मृत्यू झाला. त्यामध्ये दोघांनीही एकमेकांना मारहाण केली होती असे पोलिसांचे म्हणणे आहे. परंतु, या तपासावर गावकऱ्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. गोपाल नट नाव असलेल्या त्या व्यक्तीने दारुच्या नशेत त्याची पत्नी दुर्गावतीला रॉडने मारहाण केली. या मारहाणीत दुर्गावतीची अवस्था इतकी वाइट झाली होती, की ती गोपालला मारहाण करूच शकत नव्हती. शनिवारी सुद्धा त्याने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली. यावेळी मात्र, त्याने तिच्या डोक्यावर वारंवार रॉडने मारले. या मारहाणीतच तिचा मृत्यू झाला. 


गोपालचा मृत्यू गावकऱ्यांच्या मारहाणीत झालाच नाही -पोलिस
पत्नी दुर्गावतीची हत्या करून गोपाल घराबाहेर आरडा-ओरड करून निघाला. नशेत तर्र असलेल्या गोपालने गावकऱ्यांना सुद्धा शिवीगाळ केली. दुर्गावतीच्या हत्येची माहिती मिळाल्यानंतर गावकरी संतापले. त्यांनी वेळीच लाठ्या-काठ्यांनी गोपालला मारहाण सुरू केली. यामध्येच गोपालचा सुद्धा मृत्यू झाला. परंतु, पोलिसांचा असा दावा आहे की गोपालचा मृत्यू जमावाच्या मारहाणीत झाला नाही. पति-पत्नीमध्येच जी एकमेकांना मारहाण झाली होती, त्यामध्ये गोपालचा सुद्धा मृत्यू झाला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून याबाबत सविस्तर तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...