आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीच्या अस्थि घेऊन जात होता पती, चोरीच्या ट्रॅक्टरने रस्त्यातच चिरडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीनानगर- स्माशानातून पत्नीच्या अस्ती घेऊन गावी परतणाऱ्या व्यक्तीला एका ट्रॅक्टरने चिरडल्याची घटना येथे घडली. ज्या ट्रॅक्टरने व्यक्तीला चिरडले ते चोरीचे होते आणि चोर ते नशेत चालवत होता. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर चार लोक गंभीर आहेत. मृताची ओळख सुरेश कुमार (47) अशी करण्यात आली आहे. 


ट्रॅक्टर चोरी करून घेऊन जाणाऱ्या चोराची ओळख बलिजिंदर सिंह अशी झाली आहे. अपघाताच्या वेळी तो नशेत ट्रॅ्क्टर चालवत होता. लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. नंतर ट्रॅक्टर ट्रॉली चोरी झाल्याचे प्रकरण समोर आले. नशेत असल्यामुळे पोलिस त्याची विचारपूस करू शकले नाही. चालकाने रात्री ट्रॅक्टर सुजानपूर आणि ट्रॉली शेजारील गावातून चोरी केली होती.


सर्विसमॅन रमेश कुमारने सांगितले की, त्याची पत्नी सोमा दिवीचे सनिवारी निधन झाले होते. सोमवारी सकाळी साडे 10 वाजेच्या सुमारास तारागड रोडवरील स्मशानघाटातून अस्ती घेऊन गावाकडे पायी जात होतो. तेवढ्यात मागून ट्रॅक्टरने त्यांना धडक दिली. यामुळे रमेश कुमारची सायकल ट्रॅक्टरखाली आली. गावकरी सुरेश कुमार गंभारी जखमी झाले होते, त्यांना उपचारासाठी रूग्नालयात दाखल करण्यात आले होते, तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...