आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारुड्या पोलिसांची गुंडागर्दी, एक प्रश्न विचारल्याने लोकांना पळवून-पळवून मारले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साध्या वेशातील पोलिस करत होते तरुणांना मारहाण. - Divya Marathi
साध्या वेशातील पोलिस करत होते तरुणांना मारहाण.

शाहजहांपूर (उत्तरप्रदेश) - दारुच्या नशेत निरपराध लोकांना मारहाण करतानाचा पोलिसांचा व्हिडिओ समोर आला आहे. साध्या वेशातील पोलिसांनी नागरिकांवर लाठ्यांच्या एवढा भडीमार केला की तीन तरुणांच्या अंगावर लाठ्यांचे लाल-हिरवे वळ उमटले आहे. तरुणांचा दोष एवढाच होता की त्यांनी साध्या वेशातील पोलिस घरात घुसण्याचे कारण विचारले होते. यामुळे चिडलेल्या पोलिसांनी तरुणांना घराबाहेर काढून रस्त्यावर पळवून-पळवून मारले. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि पीडितांच्या तक्रारीनंतर पोलिस अधीक्षकांनी आरोपी चार पोलिसा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन चौकशीचे आदेश दिले. 

 

अक्षरशः तुटून पडले होते पोलिस
- पोलिसांच्या मारहाणीचे हे प्रकरण कलान गावातील आहे. ही घटना शनिवारी चार वाजे दरम्यानची आहे. पोलिस स्टेशनमध्ये पोलिस कर्मचारीच होळीच्या रंगात रंगले होते. यावेळी काहींनी मद्यपान केले होते. 
- दारुच्या नशेत काही पोलिस कर्माचारी शासकीय वाहनातून गावात निघाले. गावात आल्यानंतर पोलिस एका घरात बळजबरीने घुसले. साध्या वेशातील पोलिसांना घरातील तीन जणांनी घरात घुसण्याचे कारण विचारल्यानंतर त्यांच्यात थोडी बोलचाल झाली आणि त्यानंतर पोलिसांनी तिघांना घरातून मारत बाहेर काढले. रस्त्यावर त्यांच्यावर लाठ्यांची बेछूट बरसात केली. तरुण रस्त्यावर पडेपर्यंत पोलिस त्यांना मारहाण करत होते. 
- रस्त्यावर जेव्हा जमावाने पोलिसांच्या मारहाणीला विरोध केला आणि जमाव संतप्त झाला तेव्हा पोलिसांनी काढता पाय घेतला. 
- यानंतर पीडितांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेतली आणि मारहाण करणाऱ्या पोलिसांची तक्रार केली. पोलिस अधीक्षक अभिषेक राठी यांनी चार पोलिस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहे. 

बातम्या आणखी आहेत...