आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसारामला जन्मठेपेपर्यंत पोहोचवणारी लेडी ऑफिसर, धमक्या मिळाल्या तरी आसारामला उचलले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आसारामला जन्मठेपेच्या शिक्षेपर्यंत पोहचवणाऱ्या लेडी ऑफिसर. - Divya Marathi
आसारामला जन्मठेपेच्या शिक्षेपर्यंत पोहचवणाऱ्या लेडी ऑफिसर.

भीलवाडा (जोधपूर) - आसारामला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. या केसची सर्वात महत्त्वाची बाजू ठरली ती या केसचा तपास. मांडल जिल्ह्याच्या उपायुक्त चंचल मिश्रा या आसाराम केसच्या तपास अधिकारी होत्या. महिला अधिकाऱ्याने पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण शक्ती पणाला लावली होती. हा खटला दाखल झाल्यापासून कोर्टात उभा राहिपर्यंत आणि त्याही नंतर महिला पोलिस अधिकारी चंचल मिश्रा यांना अनेक धमक्या आणि विविध पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न झाला. त्यांनी भास्करकडे आपले अनुभव शेअर केले.
 
त्या म्हणाल्या, आम्ही 6 नोव्हेंबर 2013 ला चार्जशीर फाइल केले. त्यानंतर युक्तीवाद सुरु झाला. पहिली तपास अधिकारी मीच होते. आसाराच्या वतीने विविध प्रकारचे 55 अर्ज करुन सुनावणी टाळत होते. अखेर एक दिवस तत्कालिन न्यायाधीश भगवानदार म्हणाले, आता तुम्हाल परेशान होऊ देणार नाही. त्यानंतर 9 जुलै 2015 ते 11 जुलै 2016 दरम्यान 85 दिवस सुनावणी चालली. कित्येकवेळा सलग 5-5 दिवस कोर्टात ट्रायल सुरु होते. दोन दिवसांच्या सुटीमध्ये पोलिस स्टेशनचे काम पाहात होते. पुन्हा सोमवारी सकाळी जोधपूरला कोर्टात हजर व्हावे लागत होते. कित्येक महिने ना सुटी मिळाली ना घरी जाऊ शकले. माझ्या माहिती प्रमाणे एखाद्या तपास अधिकाऱ्याची एवढ्या दिवस ट्रायल चालण्याची ही पहिली वेळ होती. कोर्टात झालेली प्रश्नोत्तरे तब्बल 204 पानांत रेकॉर्ड केले गेले. बचाव पक्षाकडून असे प्रश्न विचारले जात होते, ज्यामुळे कोर्टाची दिशाभूल होईल आणि परत-परत तेच प्रश्न विचारले जात होते. त्यांचा उद्देश एकच होता की जबाबात विरोधाभास दिसला पाहिजे. मात्र मी एक पोलिस अधिकारी आहे, आणि मी ठरवले होते की आपली जबाबदारी आणि कर्तव्यापासून तसूभरही ढळायचे नाही. 

 

पोलिस आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढवणारी केस
- मी महिला आहे. मुलीला न्याय मिळवून दिला आहे. ही केस पोलिस आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ करणारी ठरणार आहे. 
- मी एक पोलिस अधिकारी आहे. प्रत्येक गुन्हेगाराला शिक्षेपर्यंत पोहोचवणे हे माझे कर्तव्य आहे. 
- जर एखाद्यासोबत चुकीचे काही घडले आहे, आणि त्याने मनाशी पक्के केले की गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे. तेव्हा त्याला न्याय मिळण्यात काहीही अडचण येत नाही. 
- पोलिसांना धमक्यांची भीती कधीच नसते. ट्रेनिंगमध्ये याची शिकवण दिली जाते की तुम्ही तुमच्या पूर्ण क्षमतेने आणि प्रामाणिकपणे पीडिताला न्याय मिळवून दिला पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...