आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking: अवैध संबंधांत सासूचा होता अडथळा, सुनेने प्रियकरासह मिळून केली निर्घृण हत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेवाडी (राजस्थान) - मीरपूर रोडवर एका वृद्धेवर धारदार शस्त्रांनी हल्ला झाल्याच्या केसचा गुंता पोलिसांनी अवघ्या 14 तासांत सोडवला आहे. याप्रकरणी खुलासा करत घटनेत सहभागी विवाहिता व तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी विवाहिता वृद्धेची सून असून अवैध संबंधांत अडथळा ठरत असल्याने तिने प्रियकरासह मिळून सासूची निर्घृणपणे हत्या केली. पोलिसांनी हत्येचा मुख्य आरोपी सूरजपुराचा रहिवासी मनराज आणि सून कोमल यांना अटक केली आहे. 

 

असे आहे प्रकरण...
- एसपी राजेश दुग्गल म्हणाले की, मीरपुर गावातील 70 वर्षीय अशरफी देवी सोमवारी सकाळी आपल्या घरातून तुर्कियावास गावात सत्संगासाठी निघाल्या होत्या.
- यादरम्यान, वाटेत बाइकस्वार एका व्यक्तीने धारदार शस्त्रांनी अशरफीवर हल्ला करून तिची हत्या केली. 
- पोलिसांनी काही तासांतच या घटनेचा प्रत्येक पैलू तपासला. दरम्यान, पोलिसांची नजर हत्येची मास्टर माइंड अशरफीच्या सुनेवर खिळली.
- प्राथमिक चौकशीत आरोपी कोमल पोलिसांना भरकटवण्याचा प्रयत्न करत होती, परंतु कडक चौकशी केल्यावर तिने सर्व हकिगत सांगून गुन्हा कबूल केला. यानंतर पोलिस हत्या करणाऱ्या आरोपी मनराजपर्यंत पोहोचले.
- पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर, दोघांच्या अवैध संबंधांमुळे ही हत्या झाल्याचे समोर आले आहे.
- एसपी म्हणाले की, कोमल आणि मनराजमध्ये मागच्या दीड वर्षापासून अवैध संबंध सुरू होते. मनराज नेहमीच घरी येत-जात होता.
- मनराजची कोमलच्या पतीशी मैत्री होती आणि त्यामुळे तो नेहमी घरी यायचा. कोमल पती प्रवीण जेव्हाही घराबाहेर राहायचा, तेव्हा मनराज घरात शिरायचा.
- एका दिवशी प्रवीणच्या आईने कोमल व मनराजला आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. यानंतर त्यांनी मनराजला पिटाळून लावले होते.
- तरीही मनराज लपूनछपून येत राहिला, परंतु कोमलला अशरफी देवी अवैध संबंधांमध्ये अडथळा ठरू लागली होती. यासाठी तिने आपल्या सासूला विष खाऊ घालून ठार करण्याचा बेत आखला आणि तो मनराजलाही सांगितला.
- मनराजने कोमलला असे करण्यापासून रोखले आणि म्हणाला की, मी स्वत:च तिला संपवतो.
- काही दिवसांपूर्वीच मनराजने कोमलला एक मोबाइल सिम दिला होता, या माध्यमातून ते बोलायचे.
- हत्येच्या एका दिवसापूर्वी रविवारी रात्री कोमलने त्याच सिमच्या माध्यमातून मनराज माहिती पुरवली की, सोमवारी सकाळी तिची सासू तुर्कियावास गावात सत्संग ऐकण्यासाठी जात आहे.
- यानंतर मनराज कटानुसार, सकाळीच मीरपूर रोडवर बाइक आणि धारदार शस्त्र घेऊन उभा राहिला होता. अशरफी देवी दिसताच त्याने पाठीमागून येऊन त्यांच्यावर अनेक वार केले. यात सासूचा जागीच मृत्यू झाला.

 

एसपींनी थोपटली पोलिसांची पाठ
- एसपी राजेश दुग्गल यांनी या हत्येचा गुंता वेगाने सोडवल्याबद्दल धारूहेड़ा सीआयए व पोलिस पथकाची पाठ थोपटली.

 

कोर्टात सादर करून घेणार कोठडी
- एसपी राजेश दुग्गल म्हणाले की, दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला आहे. आता त्यांना कोर्टात सादर करून रिमांडवर घेतले जाईल. रिमांडदरम्यान मनराजने हत्येसाठी वापरलेली बाइक आणि शस्त्रे हस्तगत केली.

 

 

बातम्या आणखी आहेत...