आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिमाचल प्रदेश : किन्नूरमध्ये 4.1 तीव्रतेचा भूकंप, कोणत्याही प्रकारची हानी नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिमला - हिमाचल प्रदेशचा किन्नूर भाग सोमवारी भूकंपाने हादरला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.1 एवढी होती. मात्र या भूकंपामध्ये कोणत्याही प्रकारची हानी झाल्याचे वृत्त अद्याप नाही. काही दिवसांपूर्वीच म्हणजे 9 मे रोजीही हिमाचल प्रदेशच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. 


हिमाचल प्रदेशात 9 मे रोजी जाणवलेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.2 एवढी त्याची तीव्रता होती. ताझिकिस्तानातील भूकंपानंतर हे धक्के जाणवले होते. त्यावेळी दिल्ली, एनसीआर आणि जम्मू काश्मीरच्या पूँछ तसेच राजौरी जिल्ह्यांमध्येही याचे धक्के जाणवले होते. कुल्लू आणि शिमल्यातील लोकांनाही हादरे जाणवले होते. 


मोठ्या भूकंपाचे संकेत...
उत्तराखंड येथील आपत्ती निवारण आणि व्यवस्थापन केंद्राने एप्रिल महिन्यातच भूकंपाचे संकेत दिले आहेत. उत्तराखंडच्या डोंगराळ भागात सतत बसणारे हादरे हे मोठ्या भूकंपाचे संकेत असू शकतात असे पियूष रौतेला यांनी म्हटले आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नसल्याचे ते म्हणाले होते. 

 

 

बातम्या आणखी आहेत...