आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Agra Lucknow Expressway Accident 8 Peeple Died In A Collision Between Container And Bolero

भीषण Accident: भरधाव बोलेरो महामार्गावर उभ्या कंटेनरला धडकली; 8 ठार, 3 गंभीर जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नौज - आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस-वेच्या तिर्वा परिसरातील उमरायपुर्वा गावाजवळ बुधवार सकाळी एका भरधाव बोलेरोची रोडवर उभ्या असलेल्या कंटेनरला धडक बसली. अपघात एवढा भीषण होता की, 8 भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी कानपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये भरती करण्यात आले आहे. मृतांमध्ये सर्व जण एकाच कुटुंबातील होते. कन्नौजचे कलेक्टर रविन्द्र कुमार म्हणाले, 7 जण घटनास्थळीच मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे, तर एकाचा रुग्णालयात नेताना वाटेतच मृत्यू झाला. काही जखमींना कानपूर मेडिकल कॉलेजला रेफर करण्यात आले आहे. सर्व जखमींना वैद्यकीय सुविधा उपलब्ध केली गेली आहे.

- अपघात पहाटे 3.57 वाजता झाला. गाडीत 11 जण स्वार होते, पैकी 3 महिला, 3 मुले आणि 2 पुरुषांचा जागेवरच मृत्यू झाला.

 

राजस्थानचे कुटुंब देवदर्शनाला जात होते
अपघातग्रस्त कुटुंब राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील होते. ते सीतापुरच्या नैमिषारण्य दर्शनसाठी जात होते. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना त्वरित रुग्णालयात हलवण्यात आले. तर कंटेनरच्या ड्रायव्हरला पकडून लोकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले.

 

ही आहेत मृतांची नावे
मृतांमध्ये राजू घासी राम, राजू रामजी लाल, विद्या देवी, संतोष देवी, सालू आणि रत्यालीराम यांचा समोवश आहे. तर पप्पू कुमार यादव, शाहिल आणि अंकित हे जखमी आहेत.  

 

 

 

बातम्या आणखी आहेत...