आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • काळीज पिळवटून टाकणारे 10 Photos: या चिमुरड्यांना खेळण्यासाठी वेळच नाही... Emotional Photos Special Story On World Day Against Child Labour In India

काळीज पिळवटून टाकणारे 10 Photos: या चिमुरड्यांना खेळण्यासाठी वेळच नाही...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - 12 जून हा जागतिक बालमजूर निषेध दिन म्हणून पाळला केला जातो. बालमजुरी ही भारतातील मोठी समस्या आहे. देशभरात अनेक बालकांना बालपणीचा आनंद सोडून मजुरी करावी लागते. त्यांच्या ना खेळण्यासाठी वेळ आहे, ना शिक्षणासाठी. गोवा युनिव्हर्सिटीमध्ये पीएचडी करत असलेले शिलिम खान यांनी या विषयावर आपला थीसिस तयार केला होता. त्यांच्या रिसर्च रिपोर्टनुसार हे चिमुरडे दिवसातील 12 ते 14 तास मजुरी करतात. यापैकी 6 मुलांनाच कामादरम्यान ब्रेक घेण्याची परवानगी मिळते.

 

आपल्याला आजूबाजूलाच... चहा तर कधी ज्यूस पाजताना भेटतील ही मुले
- बालमजूर आपल्या आसपासच असतात, परंतु आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत.
- अनेक घरांमध्ये झाडलोट करण्यापासून ते स्वयंपाक करणे, मुलांना सांभाळणे आणि भांडी घासण्यासारख्या कामांसाठी या बालमजुरांना सर्रास ठेवले जाते. सुशिक्षित वर्गातच बालमजुरांना घरकामासाठी जुंपण्याची प्रवृत्ती जास्त आहे.
- शिलिम खान यांच्या रिपोर्टनुसार, एकट्या गोव्यामध्ये दरवर्षी 7 हजार मुले मजुरीसाठी इतर राज्यांतून आणले जातात. या बालमजुरांमध्ये 38 टक्के मुले यूपी आणि 33.4 टक्के मुले कर्नाटकातून आणले जातात.
- या थीसिससाठी शिलिम यांनी 300 बालमजूर, 200 एम्प्लॉयर्स आणि 100 पालकांची मुलाखत घेतली. 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, बालमजुरांशी संबंधित काळीज पिळवटून टाकणारे 10 Photos...

बातम्या आणखी आहेत...