आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • आसारामचा एवढा होता रूबाब: पीएम ते सीएम घ्यायचे आशीर्वाद Emperor Of Rogue Baba Asaram

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आसारामचा एवढा होता रूबाब: पीएम ते सीएम घ्यायचे आशीर्वाद, 10 हजार कोटींची संपत्ती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर - 16 वर्षीय मुलीवरील बलात्कार प्रकरणातील दोषी 77 वर्षीय आसारामला जोधपूरच्या कोर्टाने बुधवारी आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. म्हणजेच बलात्कारी आसारामचे उर्वरित आयुष्य आता कैदी नंबर 130 च्या रूपात जोधपूर जेलमध्येच जाणार. पॉक्सो अॅक्टअंतर्गत देशात पहिल्यांदाच एखाद्या बलात्काऱ्याला आजन्म कारावासाची शिक्षा झाली आहे. एससी-एसटी कोर्टाचे जज मधुसूदन शर्मा यांनी आसारामला छिंदवाड़ा गुरुकुलाच्या वॉर्डन शिल्पी आणि डायरेक्टर शरतचंद्रलाही 20-20 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दोन इतर आरोपी शिवा आणि स्वयंपाकी प्रकाश यांची मुक्तता करण्यात आली.  

जोधपूर सेंट्रल जेलमध्ये बनलेल्या अस्थायी कोर्टाने सकाळी 10.30 वाजता आसारामला दोषी ठरवले. फिर्यादी पक्षाने म्हटले की, आसाराम काही संत नाहीये. त्याने कट रचून पीड़ितेला होस्टेलमध्ये बोलावून बलात्कार केला. आसारामच्या वकिलांचे तर्क फेटाळत जज म्हणाले की, हा घृणास्पद गुन्हा फक्त पीडिताच नाही, तर पूर्ण समाजाविरुद्ध आहे. त्याला मृत्यूपर्यंत तुरुंगात राहावे लागेल.

 

संपत्ती: 10 हजार कोटी, 19 देशांत 400 आश्रम
- आसारामचा जन्म पाकिस्तानच्या सिंध प्रांतात 1941 मध्ये झाला होता. फाळणीनंतर कुटुंब गुजरातेत आले.
- लीलाशाह, आसारामचे आध्यात्मिक गुरू होते. त्यांनीच असुमलचे नाव आसाराम ठेवले. आसारामचे 19 देशांमध्ये 400 आश्रम आहेत.
- अटकेच्या आधी त्याच्या भक्तांची संख्या तब्बल 4 कोटी होती. आणि 10 हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे.
- त्याची चौकशी सध्या कर विभाग व ईडी करत आहे.

 

रुबाब: अटल, गेहलोत, मोदी घ्यायचे आशीर्वाद
- राजकीय पातळीवरही आसारामचा खूप रूबाब होता. भाजप असो वा काँग्रेस, आसारामच्या अनुयायांमध्ये नेत्यांची मोठी लिस्ट आहे.
- माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यापासून ते तत्कालीन गुजरातचे सीएम नरेंद्र मोदी आणि अशोक गेहलोत, वसुंधरा राजे, रमण सिंह, दिग्विजय सिंह, शिवराजसिंह चौहान, फारुख अब्दुल्ला, लालकृष्ण अडवाणी आदी आसारामच्या व्यासपीठावर आशीर्वाद घेण्यासाठी जायचे.

 

साक्षीदारांचा मृत्यू: 10 पैकी 3 जणांची हत्या, एक बेपत्ता
- आसाराम केसमध्ये 10 साक्षीदारांवर हल्ले झालेल आहेत, यापैकी 3 जणांची हत्या झालेली आहे. एक बेपत्ता आहे. मृतांमध्ये अमृत प्रजापति, अखिल गुप्ता, कृपालसिंह आहेत. एक आणखी साक्षीदार राहुल सचान बेपत्ता झाला.
- आसारामचा खटला एकूण 1470 दिवस चालला. आतापर्यंत 12 वेळा जामीन याचिका फेटाळण्यात आली. त्याच्याकडून देशाचे 14 बडे वकील केस लढत होते. यात राम जेठमालनी आणि सुब्रमण्यम स्वामी इत्यादींचा समावेश आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...