आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'जेव्हापासून तू माहेरी गेलीस, तुझ्याविना तळमळत आहे', आत्महत्येपूर्वी पतीने लिहिली चिठ्ठी Employee Commit Suicide And Left Five Page Note For Wife

'जेव्हापासून तू माहेरी गेलीस, तुझ्याविना तळमळत आहे', आत्महत्येपूर्वी पतीने लिहिली चिठ्ठी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुरुक्षेत्र (हरियाणा) - सिगारेट ओढतानाचा प्रोफाइल फोटो टाकल्यानंतर मित्रांना व्हॉट्सअॅप अखेरचा मेसेज 'सभी को राम-राम' लिहून वेयरहाऊसच्या एका टेक्निकल सहायकाने आत्महत्या केली. आत्महत्येआधी धर्मेंद्र सोलंकीने डायरीच्या 5 पानांत आपले दु:ख व्यक्त केले. तथापि, सुसाइड नोटमध्ये थेट कुणालाही जबाबदार ठरवले नाही. रूममध्ये त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळला आहे. पोलिस म्हणाले की, धर्मेंद्रने हाताची नस कापून आत्महत्या केली आहे. पतीच्या मृत्यूची बातमी ऐकून पत्नीला धक्का बसला असून तिलाही रुग्णालयात दाखल करावे लागले. धर्मेंद्रचे वडील गीतम सिंह म्हणाले, त्याने स्वत:हूनच एवढा मोठा निर्णय घेतला. मला काही बोललाही नाही. 

 

सुसाइड नोटमध्ये काय लिहिले...
- धर्मेंद्रने पत्नी-मुलीबद्दल आपल्या डायरीत भावनिक मजकूर लिहिला आहे. त्याने 5 जून रोजी लिहिले- 'माझे लग्न 2 फेब्रुवारी 2016 रोजी झाले होते. माझेही स्वप्न होते की, पत्नी सुंदर असावी, शिकली-सवरलेली असावी.'
- 6 जून रोजी लिहिले की - 'मी बिझी असल्याने तुझा फोन उचलू शकलो नाही. आता मी राणीला दोन दिवसांपासून फोन करत आहे. बहुतेक नाराज असल्यामुळे फोन उचलत नाहीये. सोबतच लिहिले की, राणी एक दिवस तूही त्याचप्रमाणे माझ्या प्रेमासाठी तळमळशील. तसा मी तळमळत आहे.'
- 7 जूनला लिहिले - राणी जेव्हापासून तू घरी गेली आहेस, मी तुझ्याविना तळमळत आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू स्वत:तर गेलीसच, सोबतच मुलगी तनुलाही घेऊन गेली. तुम्हा दोघांविना राहणे खूप कठीण आहे. 11 मे रोजी तू माहेरी गेलीस, तेव्हापासून मी तळमळतच आहे.'

 

आत्महत्येआधी वडिलांना दिला इशारा
- वडील गीतम सिंह रडतच म्हणाले- 'एका बापापासून त्याचा मुलगा कायमचा दूर गेला, तो वारला आहे... तो माझा आधार होता. त्याने एवढे मोठे पाऊल उचलले हे अजूनही पटत नाही.'

- 'हो, आत्महत्येआधी त्याने मला हे जरूर म्हटले होते की, पत्नी अनेक दिवसांपासून त्याच्याशी (धर्मेंद्र) बोलत नाही. नेहमी फोन स्विच ऑफ करून ठेवते. मी मुलाच्या सासऱ्याचा नंबर घेऊन त्यांच्याशी बोललो होतो.'
- रडतरडतच वडील सारखे म्हणत होते की, माझा मुलगा कोणत्याही तणावात नव्हता. परंतु ते असेही म्हणाले की, दूध का दूध और पानी का पानी होना चाहिए.

 

मनातल्या मनात घुसमटत होता धर्मेंद्र
- कुटुंबीय म्हणाले, एका महिन्यापूर्वी आग्रा येथील सासुरवाडीत एक लग्न समारोह होता. त्याने पत्नी-मुलीचे रिझर्वेशनहही केले होते. परंतु 13 ते 14 रोजी विवाह सोहळा झाल्यावर पत्नी माहेरातच राहिली. धर्मेंद्र एकटाच घरी परतला.

- वडिलांच्या मते, माहेरच्यांनी सुनेला त्वचेवर डाग असल्याचे धर्मेंद्रला सांगून तिच्यावर तेथेच उपचार करण्यासाठी थांबवून ठेवले. कुटुंबीय म्हणाले, धर्मेंद्र पत्नीवर जिवापाड प्रेम करत होता. परंतु पत्नी आणि सासुरवाडीची मंडळी त्याच्या भावना समजू शकले नाहीत. यामुळे मनातल्या मनातच धर्मेंद्र घुसमट सुरू होती.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...   

बातम्या आणखी आहेत...