आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीर: शोपियां येथे लष्कराच्या पोस्टवर हल्ला, चकमकीत एका दहशतवाद्यासह 4 ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शोपियां येथे झालेल्या चकमकीत येथील स्थानिक दहशतवादी अहमद डार (वर्तुळातील) मारला गेला. (फाइल) - Divya Marathi
शोपियां येथे झालेल्या चकमकीत येथील स्थानिक दहशतवादी अहमद डार (वर्तुळातील) मारला गेला. (फाइल)

श्रीनगर - काश्मीरमधील शोपियां येथे रविवारी रात्री दहशतवाद्यांनी लष्कराच्या एका मोबाइल चेकपोस्टवर हल्ला केला आहे. त्यानंतर लष्कराने जोरदार प्रत्यूत्तर दिले. या कारवाईत एका स्थानिक दहशतवाद्यासह चार जणांचा मृत्यू झाला. लष्कराच्या प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले की चकमकीत एका दहशतवाद्यासह त्याचे तीन सहकारी मारले गेले आहे. अजूनही ऑपरेशन सुरु आहे. 

 

कारमध्ये होते दहशतवादी 
- लष्कराच्या सूत्रांच्या माहितीनुसार, पहनू भागातील हायस्कूलसमोर 44 राष्ट्रीय रायफलने मोबाइल चेक पोस्ट लावली होती. रात्री साधारण 8 वाजता एका कारमध्ये दहशतवादी आले आणि त्यांनी चेकपोस्टवर फायरिंग सुरु केली. जवानांनी त्यांना तत्काळ प्रत्युत्तर देत कारवाई केली. त्यानंतर कार पुढे निघून गेली. काही अंतरावर गेल्यानंतर कार थांबली आणि त्यातील एक दहशतवादी पळून जाऊ लागला. जवानांनी त्याला तिथेच ठार केले. 
- चकमकीत मारला गेलेला दहशतवादी शोपियां येथीलच असल्याची माहिती मिळाली  आहे. त्याचे नाव शाहिद अहमद डार असल्याचे कळते. त्याच्याकडे एके-47 रायफल सापडली. 
- कारची झडती घेतली तेव्हा त्यामध्ये तीन जणांचे मृतदेह आढळून आले. लष्कारच्या सूत्रांच्या माहितीनुसार हे तिघे दहशतवाद्याला मदत करत होते. चकमकी दरम्यान तेही लष्कराच्या गोळीचे शिकार झाले.

बातम्या आणखी आहेत...