आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • England Can Boycott Football World Cup 2017 Amid Allegations On Russia Over Nerve Agent

ब्रिटनमध्ये गुप्तहेरावर विष प्रयोग: US म्हणाले- न्यूयॉर्कवरही केमिकल हल्ला करु शकतो रशिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - रशियाच्या माजी गुप्तहेराला ब्रिटनमध्ये विष देऊन मारण्यात आल्याच्या प्रकरणात अमेरिकेने ब्रिटनला पाठिंबा दिला आहे. संयुक्त राष्ट्राच्या (यूएन) सुरक्षा परिषदेच्या आपातकालिन बैठकीत अमेरिकेच्या राजदूत निकी हेली म्हणाल्या, 'ब्रिटनमध्ये दोन जणांना विष देऊन मारण्यात आले. या षडयंत्रामागे रशिया आहे हे अमेरिकेचे मत आहे. अशा घटनांना पायबंद घालायचा असेल तर कडक पाऊल उचलावे लागेल. अन्यथा उद्या न्यूयॉर्क किंवा परिषदेमध्ये असलेल्या कोणत्याही देशावर हल्ला होऊ शकतो. रशिया न्यूयॉर्कवरही केमिकल वेपन्सचा वापर करण्यास मागेपुढे पाहाणार नाही.'

 

इंग्लंड फुटबॉल वर्ल्डकपवर बहिष्कार टाकण्याची शक्यता 
- या घटनेचे जूनमध्ये होऊ घातलेल्या फुटबॉल वर्ल्डकपवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. रशिया वर्ल्डकपचा यजमान देश आहे. इंग्लंड या स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे. 
- इंग्लंडचे कॉमन फॉरेन अफेअर्स कमिटीचे चेअरमन टॉम टूजनधट म्हणाले, 'रशियाची पुतिन सरकार आपल्या विरोधकांना अशाच पद्धतीने संपवते. याचा आपण विरोध केला पाहिजे. इंग्लंडने वर्ल्डकपवर बहिष्कार टाकून रशियावर दबाव टाकला पाहिजे.' अनेक मीडिया ग्रुपनेही वर्ल्डकपवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. 

 

काय आहे प्रकरण ? 
- रशियाचा पूर्वाश्रमीचा हेर सर्गेई स्क्रिपल आणि त्यांची मुलगी यूलिया हे दोघे 2010 पासून इंग्लंडमध्ये राहात होते. हे दोघे 4 मार्च रोजी विल्टशर येथील सेल्सबरी सिटी सेंटरच्या बाहेर बेशुद्ध आवस्थेत सापडले होते. दोघांची स्थिती गंभीर होती. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 
- ब्रिटीश मीडियाच्या वृत्तानुसार, गुप्तहेर आणि त्यांच्या मुलीला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करणारे पोलिस कर्मचारी निक बेली यांच्यावर देखील विषाचा परिणाम झाला असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.