आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • भारतातील प्रत्येक महिलेला माहिती असावेत हे अधिकार Every Women Must Know These Helpline Telephone Numbers

भारतातील प्रत्येक महिलेला माहिती असावेत हे अधिकार, कोणत्याही अडचणीवर करता येईल मात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - महिलांच्या मदतीसाठी सरकारने नंबर जारी केले आहेत. यावर कॉल करून त्वरित मदत मिळवली जाऊ शकते. वुमन्स हेल्पलाइन नंबर 1091/1090 पूर्ण देशभरासाठी आहे. याशिवाय महिला नॅशनल कमिशन फॉर वुमन (NCW) लाही आपले काही म्हणणे सांगू इच्छित असतील तर त्या 0111-23219750 यावरही कॉल करू शकतात. राज्यांनी आपल्या स्तरावरही हेल्पलाइन नंबर जारी केले आहेत. ज्यावर कॉल करून लगेच मदत मिळवली जाऊ शकते.


राजधानीत या क्रमांकांच्या माध्यमातून महिलांना मिळते मदत
दिल्ली कमिशन फॉर वुमन (DCW) मधून 011 23378044/ 23378317/ 23370597 वर संपर्क केला जाऊ शकतो. पोलिस कंट्रोल रूम 100, चाइल्ड हेल्पलाइन 1098, अँटी स्टाकिंग सेलला 1096 वर कॉल करून मदत मागितली जाऊ शकते.

 

कोणीही डावलू शकत नाही महिलांचे हे अधिकार
> प्रत्येक महिलेला काही Rights मिळालेले आहेत. कोणीही हे अधिकार महिलांकडून हिसकावू शकत नाही. उदा. महिला आपल्या जोडीदाराला शारीरिक संबंधांसाठी नकार देऊ शकते. याच प्रकारे एखाद्या बलात्कार पीडित महिलेलाही मोफत कायदेशीर मदत मिळवण्याचा अधिकार असतो. अशा प्रकरणांमध्ये लीगल सर्व्हिस अॅथॉरिटीला महिलेसाठी वकिलाची व्यवस्था करावी लागते. दुसरीकडे, एखाद्या प्रकरणात जर महिला आरोपी असेल तर तिची जी काही वैद्यकीय तपासणी केली जाईल ती एखाद्या महिलेद्वारेच केली गेली पाहिजे.
> याशिवाय वडिलोपार्जित संपत्तीवरही महिला आणि पुरुषाचा समान हक्क आहे. हायकोर्ट अॅडव्होकेट संजय मेहरा म्हणाले की, हे अधिकार महिलांना हिंदू उत्तराधिकार अधिनियमांतर्गत मिळालेले आहेत. वर्क प्लेसवर जर एखाद्या महिलेचे लैंगिक शोषण होत असेल तर ती लैंगिक शोषण अधिनियमांतर्गत याविरुद्ध तक्रार दाखल करू शकते. आज आम्ही महिलांशी संबंधित असे 6 राइट्स सांगत आहोत जे प्रत्येकाला माहिती असलेच पाहिजे. कोणतीही व्यक्ती महिलांच्या या अधिकारांना डावलू शकत नाही.  

 

या परिस्थितीत महिला करू शकतात गर्भपात, 6 पर्सनल Rights पाहा पुढच्या स्लाइड्सवर...

बातम्या आणखी आहेत...