Home | National | Other State | Ex CM Akhilesh Yadav On Bungalow Matter

बंगल्यात मी माझ्या पैशाने साहित्य आणले होते, ते घेऊन गेलो; अखिलेश म्हणाले- आरोप निराधार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 13, 2018, 03:23 PM IST

सुप्रीम कोर्टाने माजी मुख्यमंत्र्यांना सरकारी निवासस्थान खाली करण्याचे आदेश दिले होते.

 • Ex CM Akhilesh Yadav On Bungalow Matter

  > सुप्रीम कोर्टाने माजी मुख्यमंत्र्यांना सरकारी निवासस्थान खाली करण्याचे आदेश दिले होते.

  > मुलायमसिंह यादव, राजनाथसिंह, मायावती यांनी बंगले रिकामे केले होते.

  लखनऊ - समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सरकारी बंगल्यातील तोडफोडीवर बुधवारी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, 'माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप निराधार आहेत. बंगल्याचे जे फोटो दाखवले जात आहे, त्यात सत्यता नाही. मी माझ्या पैशाने बंगल्यात जे साहित्य आणले होते, तेच फक्त काढून घेऊन गेलो होतो.' अखिलेश म्हणाले, भाजपचा राज्यात सातत्याने पराभव होत आहे. त्यामुळे त्यांना काय बोलावे आणि काय नाही हे कळत नाही. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर 2 जून रोजी अखिलेश यादव यांनी सरकारी बंगला रिकामा केला होता.

  अखिलेश यादव यांनी मीडियाला दाखवली तोटी, म्हणाले- परत करायला आलो...
  - अखिलेश यादव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत तोटी दाखवत म्हटले, की ही वस्तू परत करण्यासाठी आलो आहे. मुख्यमंत्री निवासस्थानात माझे खूप सारे साहित्य आहे, ते मुख्यमंत्र्यांनी परत करावे.
  - टिकाकारांचा समाचार घेताना अखिलेश म्हणाले, लोक प्रेमात अंधळे होतात, मात्र द्वेषानेही अंधळे होत असल्याचे आता पाहायला मिळाले आहे.
  - स्विमिंग पुलवर अखिलेश म्हणाले, 'गेल्या सव्वा वर्षात माझ्या घरी एक हजाराहून अधिक मुले आली होती. या सर्वांना विचारावे की स्विमिंग पुल कुठे आहे. जो स्विमिंग पुलच नव्हता, तो गायब झाल्याच्या बातम्या केल्या गेल्या. पुलावर माती टाकून तो बुजवण्यात आल्याचे सांगण्यात आले.'

  मी माझ्या पैशाने माझ्या गरजा पूर्ण केल्या
  - अखिलेश यादव म्हणाले, 'कोणतीही व्यक्ती ज्या घरात राहायला लागते तेव्हा त्यांना त्या घराविषयी आत्मियता निर्माण होते. मग ते आपल्या पद्धतीने ते घर सजवतात. मी माझ्या पैशाने घरातील गरजेच्या वस्तू खरेदी केल्या होत्या. माजी मुख्यमंत्र्यांना सरकारी निवासस्थान मिळाल्यानंतर ते तिथे आपल्या आवडीने बदल करु शकतील अशी व्यवस्था तेव्हा होती, त्यानुसारच बदल केले गेले होते.'
  - मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांच्या मुख्य सचिवांवर भ्रष्टाचाराचा आरोप झाला आहे. त्यावर अखिलेश म्हणाले, पोलिसांनी एकाच दिवसात आरोपीला मनोरुग्ण ठरवले.
  - अखिलेश म्हणाले राज्याला एक्सप्रेसवे आणि मेट्रो आमच्या सरकारने दिली, मात्र संकुचित मनाच्या योगी सरकारने कधीही आमचे नाव घेतले नाही. कारण यांना गोरखपूर आणि फुलपूरचा पराभव पचलेला नाही.

 • Ex CM Akhilesh Yadav On Bungalow Matter

Trending