आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • This Ex PM Banned RSS And Sacked BJP Governments In 4 States Narasimha Rao Birth Anniversary Special Story

या नेत्याने आणली होती RSS वर बंदी, 4 राज्यातील BJP सरकारे केली होती बरखास्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - पी. व्‍ही. नरसिंहराव देशाचे अष्‍टपैलू व्‍यक्तिमत्‍त्‍व असलेले 9 वे पंतप्रधान होते. 28 जून 1921 रोजी त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आयुष्यातील ठळक घडामोडींची ही माहिती divyamarathi.com देत आहे. 

 

घेणार होते निवृत्‍ती, झाले पंतप्रधान

 राजकारणातून निवृत्त होण्याच्या उद्देशाने त्यांनी 1991 ची लोकसभा निवडणूक लढवली नाही. दरम्‍यान, काँग्रेसचे अध्यक्ष आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर राव यांची काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावर काँग्रेस पक्ष केंद्रात सरकार बनवण्याच्या स्थितीत होता. पक्षाचे नेते म्हणून राव यांची निवड झाली आणि त्यांनी 21 जून 1991 रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

 

अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, 17 भाषांवर प्रभुत्व

भारताच्या आर्थिक स्थितीत सुधारणांचे श्रेय मनमोहन सिंग यांच्या प्रमाणेच त्यांची नियुक्ती करणाऱ्या या पंतप्रधानांकडेही जाते. अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे धनी नरसिंहराव यांचे 17 भाषांवर त्‍यांचे प्रभुत्‍व होते. मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तामिळ, उर्दू, कन्‍नड यासह इतर भाषांतून त्‍यांनी साहित्‍य निर्मिती केली. राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून त्‍यांनी उच्‍च शिक्षण घेतले. तसेच नागपूर जिल्‍ह्यातील रामटेक या मतदारसंघाचे 2 वेळा ते खासदारही होते.  

 

RSS वर आणली बंदी, 3 राज्यांतील भाजप सरकारे केली बरखास्त

त्‍यांच्‍या पंतप्रधानपदाच्‍या काळात अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशिद उद्ध्वस्त केली. त्याच दिवशी सायंकाळी केंद्र सरकारने उत्‍तरप्रदेशातील भाजप सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली. अयोध्येतील घटनांना जबाबदार ठरवून राव सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांवर बंदी आणली. तसेच भारतीय जनता पक्ष सत्तेत असलेली राजस्थान, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश ही राज्य सरकारे बरखास्त केली.


वाजपेयींना आणला होता अविश्‍वास प्रस्‍ताव

अयोध्येतील घटना, त्यानंतर देशात झालेल्या दंगली, हिंदुत्ववादी संघटनांवर आणलेली बंदी आणि राज्य सरकार बरखास्ती या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी राव सरकारविरूद्ध दुसरा अविश्वास प्रस्ताव आणला. पण, तो फेटाळला गेला. जुलै 1993 मध्‍ये राव  सरकारविरूद्ध सर्व विरोधकांनी तिसरा अविश्वास प्रस्ताव आणला. पण तोही फेटाळला गेला.

 

देशाची अर्थव्‍यवस्‍था केली मजबूत

 नरसिंह रावांच्या सरकारपुढे देशाची आर्थिक स्थिती सांभाळण्याचे मोठे आव्हान होते. त्यांनी मनमोहन सिंग या निष्णात अर्थतज्ज्ञाची अर्थमंत्री म्हणून नेमणूक केली.  तत्‍कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी  त्‍यांच्‍या अपेक्षेप्रमाणे काम केले. 
 

भ्रष्‍टाचाराचे आरोप, स्वपक्षीयांनीच पुकारले बंड

वर्ष 1994 मध्‍ये राव सरकारावर भ्रष्‍टाचाराचे आरोप झाले. त्‍यामुळे आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा मोठा पराभव झाला. त्या पराभवास राव यांना जबाबदार धरून मनुष्यबळ विकासमंत्री अर्जुन सिंग यांनी राव यांच्याविरुद्ध बंड पुकारले. मार्च 1995 मध्ये महाराष्ट्र, गुजरात, बिहार आणि ओडिशा या राज्यांत विधानसभा निवडणुका झाल्या. त्यात केवळ ओडिशामध्ये काँग्रेसला सत्ता स्थापन करता आली.


पंतप्रधान राहिलेल्‍या व्‍यक्‍तीला काँग्रेसने नाकारली उमेदवारी

- राव यांनी आपल्‍या दूरदृष्‍टीने देशाला विकासाच्‍या वाटेवर नेले. खुल्‍या अर्थव्‍यवस्‍थेचा स्‍वीकार करून अर्थव्‍यवस्‍था मजबूत दिली.
- मात्र त्‍यांच्‍यावर झालेले भ्रष्‍टाचाराचे आरोप. अनेक राज्‍यात कॉंग्रेसचा झालेला परावभ, यामुळे वर्ष 1998 मध्‍ये कॉंग्रेसने त्‍यांना उमेदवारी नाकारली.  त्यानंतर ते सक्रीय राजकारणातून निवृत्त झाले. 23 डिसेंबर 2004 रोजी त्यांचे निधन झाले.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत नरसिंह राव यांच्या आयुष्यातील ठळक घडामोडी व Photos...  

बातम्या आणखी आहेत...