आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोतया डॉक्टरने गर्भातील मुलाला मुलगी सांगितले, बिंग फुटेल म्हणून लिंग कापले, नवजात बाळाचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चतरा (झारखंड)- चतरा जिल्ह्यातील झटखोरी येथे दोन तोतया (झोलाछाप) डॉक्टरांनी एका नवजात बाळाचे लिंग कापण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यात बाळाचा मृत्यू झाला आहे. आरोपींनी आपले बिंग फुटू नये म्हणून हे कृत्य केले होते. त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झाला असून ते फरार आहेत. 

 

काय आहे प्रकरण 
- बलिया गावातील गुड्डी देवी 8 महिन्यांची गर्भवती होती. 24 एप्रिल रोजी तिला त्रास होऊ लागल्यानंतर कुटुंबियांनी तिला ओम क्लिनिकमध्ये दाखल केले. येथील डॉक्टर अरुण आणि अनुज यांनी तिचे अल्ट्रासाऊंड करुन मुलीचा गर्भ असल्याचे सांगितले. 
- गुड्डीने बाळाला जन्म दिला आणि तो मुलगा असल्याचे लक्षात आल्यानंतर तोतया डॉक्टरांना आपले बिंग फुटेल या भीतीने घेरले, त्यातच त्यांनी नवजात बाळाचे लिंग कापले. मोठ्या प्रमाणआत रक्तस्त्राव झाल्यानंतर बाळाचा मृत्यू झाला. 

 

कुटुंबियांना पैशांचे अमिष 
- झोलाछाप डॉक्टरांचा कारनामा एवढ्यावरच थांबला नाही तर त्यांनी कुटुंबियांना सांगितले की बाळ दिव्यांग होते, आणि त्याचा मृत्यू झाला. 
- पीडित कुटुंबाने घटनास्थळी जाऊन स्वतः पाहाण्याचा प्रयत्न केला तर डॉक्टरांचे कृत्य त्यांच्यासमोर आले. 
- कुटुंबाला झोलाछाप डॉक्टरांचे कृत्य लक्षात आल्यानंतर त्या डॉक्टरांनी त्यांना एक लाख रुपये देऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. परंतू पीडित कुटुंब त्यांच्या अमिषाला बळी पडले नाही. 

 

हत्येचा गुन्हा दाखल, आरोपी फरार 
- पीडित कुटुंबाने मंगळवारी रात्री पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी बुधवारी सकाळी क्लिनिकवर छापा टाकले तेव्हा दोन्ही झोलाछाप डॉक्टर फरार झाले होते. 
- पोलिसांनी सांगितले, की अनुज आणि अरुण यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते दोघे फरार असून पोलिसांनी त्यांचे क्लिनिक सील केले आहे. 
- राज्याचे आरोग्यमंत्री रामचंद्र चंद्रवंशी यांनी सिव्हिल सर्जनला चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दोन्ही आरोपी बिहारमधील बाराचट्टी येथील रहिवासी आहे. 

 

आरोग्य विभागाने काय कारवाई केली
- झटखोरी हॉस्पिटलचे सिव्हिल सर्जन प्रभारी डॉ. डी.एन. ठाकूर यांनी 13 एप्रिल रोजी अवैधरित्या सुरु असलेल्या क्लिनिकवर छापा टाकला होता. यावेळी त्यांनी ओम क्लिनिकवरही छापा टाकला होता. 
- आरोग्य विभागाच्या छापेमारी झाली तेव्हा क्लिनिकचा संचालक अनुजकुमारही उपस्थित होता. त्याच्याकडे कागदपत्रांची मागणी करण्यात आली होती. आरोपीने आरोग्य विभागात कागदपत्र जमा केले नाही, तरी राजरोसपणे क्लिनिक सुरु होते. 

- आता नागरिकांकडून आरोग्य विभागाला प्रश्न विचारला जात आहे, की वेळीच कारवाई केली असती तर नवजात बाळाचे प्राण वाचले असते. 

 

पुढील स्लाइडमध्ये इन्फोग्राफिक्समध्ये जाणून घ्या प्रकरण...

बातम्या आणखी आहेत...