आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Murder: शिक्षिकेचे मुंडके छाटून हातात घेऊन फिरत होता, 4 तासांच्या प्रयत्नानंतर झाली अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरायकेला (झारखंड) - येथील एका प्राथमिक शाळेसमोर राहणाऱ्या माथेफिरुने एका शिक्षिकेचा शिरच्छेद केला. तसेच हातात तिचे मुंडके घेऊन 5 किमी पायी फिरला. ही घटना मंगळवारी झारखंडच्या सरायकेला येथे घडली आहे. महिलेचे कपडे परिधान करून हातात मुंडके घेऊन फिरणाऱ्या या माथेफिरुला पाहून परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. हा सायको किलर तब्बल 4 तास तसाच फिरत होता. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली. या घटनेमुळे अख्ख्या परिसरात खळबळ उडाली आहे. 


शाळेतून बाहेर बोलावले, मग...
पीडित महिलेचे नाव सुकुरू हेस्सा (35) असे आहे. ती आदित्यपूर येथील रहिवासी होती. तसेच 2016 पासून या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती. माथेफिरुचे नाव हरी हेंब्रम (45) असून तो शाळेसमोरच भटकत होता. तो रोज या शिक्षिकेला टक लावून पाहायचा. अशाच प्रकारे मंगळवारी सुद्धा तो सुकुरूला असेच पाहत होता. यानंतर शाळेत गेला आणि शिक्षिकेला बाहेर बोलावले. शिक्षिका बाहेर रस्त्यावर आली तेव्हा माथेफिरूने धारदार शस्त्राने तिच्या गळ्यावर वार केला. यानंतर इतके वार केले की तिचे शिर धडापासून वेगळे झाले. 


4 तास पाठलाग करत होते पोलिस
माथेफिरू हरीने शिर धडापासून वेगळे करून ते हातात धरले आणि तसाच परिसरात फिरत होता. हरीने स्त्रीचे कपडे घातले होते. यासंदर्भातील माहिती मिळताच शालेय परिसरात गर्दी गोळा झाली. त्यापैकी काहींनी पोलिसांना घटनास्थळी बोलावले. पोलिस पोहोचले तेव्हा हरी पळून गेला. त्यावेळी सुद्धा त्याने महिलेचे मुंडके हातातून सोडले नव्हते. एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात शिर घेऊन तो धावत होता. अखेर 4 तासांच्या प्रयत्नानंतर तो पोलिसांच्या हाती लागला. 

बातम्या आणखी आहेत...