आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्याने हवेतून वीजनिर्मिती करणारी मशीन बनवल्याचा दावा, पीएम मोदींनाही पाठवले पत्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मथुरा (उत्तर प्रदेश) - चौथीपर्यंत शिकलेल्या मथुराचे एक 36 वर्षीय शेतकरी उदयवीर यांनी एक अशी मशीन बनवल्याचा दावा केला आहे की, जी हवेतून वीजनिर्मिती करेल. या शोधासाठी जिल्हाभरात शेतकऱ्याचे कौतुक होत आहे. उदयवीर सांगतात की, या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी त्यांना सरकारकडून कोणतीही मदत मिळाली नाही, परंतु आता त्यांना मदतीची अपेक्षा आहे.

- जिल्ह्यापासून 45 किलोमीटर अंतरावर गढ़ी-डड्डी गावातील रहिवासी उदयवीर यांनी हवेच्या माध्यमातून वीज तयार करून दाखवली आहे. उदयवीर म्हणाले की, त्यांचे वडील शेतातील कामासोबतच गावातील ट्रॅक्टर दुरुस्ती करायचे. मी त्यांना हे काम करताना पाहत आलो आहे. एका दिवशी मी व माझी पत्नी शेतात गहू कापण्यासाठी गेले. जेव्हा घरी परतले तेव्हा वीज गुल झालेली होती. घरातील इन्व्हर्टरही डाऊन होते. 
उदयवीर म्हणाले की, या प्रसंगामुळे मी एका छोट्या मशीनवर काम करणे सुरू केले आणि जसजसे मला यश मिळत गेले मी मोठी मशीन बनवायला घेतली. 2010 मध्ये मी या प्रोजेक्टवर काम करणे सुरू केले आणि 8 वर्षे 7 महिन्यांच्या अथक परिश्रमांनंतर मी एक अशी मशीन तयार केली, जिच्यातून पाण्याशिवाय वीजनिर्मिती केली जाऊ शकते.
- या मशीनला उदय भास्कर इलेक्ट्रिक जनरेशन नाव देण्यात आले आहे. ती बनवण्यासाठी त्यांना 1.50 लाख रुपये एवढा खर्च आला. या प्रोजेक्टवर काम करत असताना उदयवीर यांच्या पायांच्या शिरा ब्लॉक झाल्या होत्या. 2015 मध्ये त्यांचा एक पाय डॉक्टरांना कापावा लागला.

 

पीएम मोदींना पाठवले आहे पत्र: 
उदयवीर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही मी माझ्या शोधाबाबत पत्र लिहून पाठवले आहे. अजूनपर्यंत त्यांचे उत्तर आलेले नाही. उदयवीर सांगतात की, या मशीनमध्ये 4 बॅटरीज लावण्यात आल्या आहेत. दिवसभरात एक माणूस जेवढा ऑक्सिजन घेतो, तेवढाच ही मशीन घेते आणि यातून वीजनिर्मिती होते. शिवाय यातून कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. 

 

बातम्या आणखी आहेत...