आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • विवाहितेची बलात्काराची तक्रार; जजनी स्वत: सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर वेगळेच सत्य समोर आले Fast Track Court Notice To Woman For False Molestation Complaint In Delhi

विवाहितेची बलात्काराची तक्रार; जजनी स्वत: सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर वेगळेच सत्य समोर आले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

> दिल्लीच्या फास्ट ट्रॅक कोर्टाने रेप प्रकरणातील पीडित महिलेला पाठवली नोटीस.

> सीसीटीव्ही फुटेजवरून कळले की, महिलेने रेपचा खोटा आरोप लावला होता.
> जज म्हणाले की, मग आता खोटा आरोप लावल्यामुळे महिलेलाच शिक्षा का होऊ नये.

 

नवी दिल्ली - रेपच्या एका प्रकरणात दिल्लीच्या फास्ट ट्रॅक कोर्टाने पीडित महिलेविरुद्धच नोटीस जारी केली आहे. वास्तविक, याप्रकरणी कोर्टाला सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर आढळले की, सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित झाले आहेत. परंतु, महिलेने बलात्काराचा खोटा आरोप लावत खोटी कहाणी रचली होती. यामुळे आता बलात्काराचा खोटा आरोप ठेवणाऱ्या महिलेलाच का शिक्षा होऊ नये, अशी विचारणा कोर्टाने केली आहे.

- रिपोर्टनुसार, जज अनु ग्रोव्हर बलिगा म्हणाल्या की, कथित क्राइम सीनचे सीसीटीव्ही फुटेज पूर्ण प्रकरणात महत्त्वाचा पुरावा ठरला. याद्वारेच कोर्ट निर्णयाप्रत आले आहे. 
- जज म्हणाल्या की, फुटेजमध्ये आरोप करणारी तरुणी आरोपीलाच मिठीत घेताना दिसत आहे, त्याला किस करून त्याचे कपडे स्वत: उतरवताना दिसत आहे.
- जज म्हणाल्या की, या फुटेजवरून हे स्पष्ट होते की, महिला आणि आरोपीदरम्यान आपसी सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते. महिला खोटे बोलत असल्याचा हा मोठा पुरावा आहे.
- कोर्टाने याप्रकरणी आरोपी व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली आहे. दुसरीकडे कोर्टाने बलात्काराचा चुकीचा आरोप लावणाऱ्या महिलेलाच शिक्षा का होऊ नये असा प्रश्न विचारला आहे.

 

महिलेने ऐकवली होती ही कहाणी...
महिलेने सांगितले होते की, 2007 मध्ये पतीशी झालेल्या घटस्फोटानंतर एका मेट्रिमोनियल साइटच्या माध्यमातून ती तरुणाशी संपर्कात आली होती. तरुणाच्या नावावरच तिने एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. यात ती आपल्या मुलीसोबत राहत होती. 19 मार्च 2013 रोजी तिला आपल्या घरमालकाकडून घर सोडण्याची नोटीस मिळाली. घराचे अॅग्रिमेंट तरुणाच्या नावे होते, यामुळे ती त्याच्या ऑफिसात गेली. महिलेने बलात्काराचा आरोप ठेवत म्हटले की, येथे त्या तरुणाने तिला कॉफी पाजली, जी प्यायल्यानंतर ती बेशुद्ध झाली. यानंतर ती जेव्हा शुद्धीत आली, तेव्हा विवस्त्रावस्थेत कार्पेटवर पडलेली होती.   

बातम्या आणखी आहेत...