आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेजारी अडकावा म्हणून बापाने पोटच्या मुलीचा आवळला गळा, तरीही मेली नाही, मग चाकूने चिरले पोट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेतिया (बिहार) - मटियरिया परिसरात 30 जून रोजी झालेल्या चिमुकलीच्या हत्याकांडाला वेगळे वळण लागले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत बालिकेच्या वडिलांनी स्वत: पोलिस स्टेशनमध्ये पोहोचून पोटच्या मुलीची हत्या केल्याचे कबूल केले आहे. परंतु या हत्येमागचे कारण खूप चकित करणारे आहे. पोलिसांनी कथित आरोपी नेक मोहम्मदला अटक करून तुरुंगात पाठवले आहे. पोलिसांनी प्रेस कॉन्फरन्स करून याप्रकरणी खुलासा केला आहे.

 

- शुक्रवारी नरकटियागंजचे एसडीपीओ निसार अहमद म्हणाले, मृत सुंदरीचे वडील नेक मोहम्मद आणि त्याच्या शेजाऱ्यांमध्ये वैर होते. नेक मोहम्मदने शेजाऱ्यांना फसवण्याचा कट रचला.

- पोलिस सांगतात की, घटनेच्या दिवशी आरोपी शेतात जात होता. त्याने बहण्याने आपल्या मुलीला पाणी घेऊन यायला सांगितले. चिमुरडी तेथे पोहोचताच बापाने तिचा दोरीने गळा आवळला. तरीही ती मेली नाही, म्हणून चाकूने तिचे पोट चिरले. आपल्या शेजाऱ्यांना अडकवण्यासाठी त्याने आपल्या मुलीचा मृतदेह शेतात फेकून दिला.

- एसडीपीओ म्हणाले, तपासात ही बाब समोर आली आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. तथापि, जेव्हा रिपोर्टरने कुटुंबीयांशी बातचीत केली तेव्हा त्यांचे वेगळेच म्हणणे समोर आले. मुलीने पोलिसांवरच आरोप केले.

 

मारहाणीच्या भीतीपोटी वडिलांनी कबूल केला गुन्हा; मोठ्या मुलीचा आरोप
- आरोपीची मोठी मुलगी जैनब म्हणाली, तिचे वडील बुधवारी आत्याच्या घरी गेलेले होते. गुरुवारी नरकटियागंज पोलिसांनी त्याला तेथून बोलावले. पोलिस स्टेशनमध्ये तिचे वडील आणि मामा पोहोचले. पोलिसांनी मामाला हाकलून लावले. यानंतर वडिलांना बेदम मारहाण केली. यामुळे त्यांना जबाब बदलावा लागला.

- दुसरीकडे, याबाबत विचारताच एसडीपीओ म्हणाले, तपासात ही बाब समोर आली आहे की, हत्या नेक मोहम्मदनेच केली आहे. जेव्हा त्याची कडक चौकशी करण्यात आली, तेव्हा त्याने आपला गुन्हा कबूल केला. त्याला अजिबात मारहाण झालेली नाही.

 

पोलिसांवर दबाव?
गावकरी सांगतात की, नेक मोहम्मदशी ज्याचे नेहमी भांडण व्हायचे, त्याने त्याचे घरही जाळले आणि 30 हजार रोखही हिसकावले. नेक मोहम्मदने ज्यांनी आपल्या मुलीची हत्या केल्याचे म्हटले होते ते सर्व दबंग आहेत. यामुळे पोलिसांवर दबाव असल्याची चर्चा सुरू आहे.

 

काय आहे प्रकरण?
- 30 जून रोजी नेक मोहम्मदची 8 वर्षीय मुलगी सुंदरीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. तिच्या गळ्यात एक मोठी दोरीही होती. याप्रकरणी वडिलांच्या जबाबावरून 4 शेजाऱ्यांविरुद्ध हत्येची तक्रार नोंदवण्यात आली होती.
- याप्रकरणी ही बाब समोर आली होती की, सुंदरी दररोज जेवण केल्यानंतर आपल्या आईच्या घरापासून पाचशे मीटर अंतरावरील आपल्या आजीच्या घरी झोपण्यासाठी जायची. परंतु त्या रात्री 10 वाजूनही ती पोहोचली नाही, म्हणून शोधाशोध सुरू झाली. सकाळी उसाच्या शेतात तिचा मृतदेह आढळला होता. 

 

बातम्या आणखी आहेत...