आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shocking: DIG Kanpur Allegedly Made Forcefully Relations With Daughter in law For Grandson

लज्जास्पद: सुनेला दोन्ही मुलीच झाल्या म्हणून सासऱ्यानेच केला बलात्कार, म्हणाला- माझा मुलगा नामर्द..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानपूर - 'वंशाला दिवा पाहिजे' म्हणत माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो, याचे ही घटना म्हणजे सर्वात लज्जास्पद उदाहरण आहे. शहरात एका सेवानिवृत्त डीआयजीवर त्याच्या सुनेने गंभीर आरोप केले आहेत. सुनने सांगितले की, 'वंशाला दिवा पाहिजे, नातूच पाहिजे म्हणत माझ्या सासऱ्याने मुलगा नामर्द असल्याचे सांगून तिच्याशी बळजबरी संबंध प्रस्थापित केले.' 

वंश पुढे नेण्यासाठी तो सुनेवर लग्नाचा दबाव टाकत होता, परंतु तिने नकार दिल्यावर त्याने बलात्कार केला. पीडित विवाहितेला 2 लहान मुली आहेत. पती आणि सासूला जेव्हा सासऱ्याचे हे पाशवी कृत्य कळले, तेव्हा उलट त्यांनी सुनेलाच मुलींसकट घराबाहेर हाकलले.

 

पोलिसांनी घेतली नव्हती दखल
पोलिसांतही तिची कुणी दखल घेतली नाही. कारण सासरा तर सेवानिवृत्त डीआयजी. उलट तिची मदत करणाऱ्यांवरच सासऱ्याने केस दाखल केली. आता प्रकरण तापल्याचे पाहून काही सामाजिक संघटनांनी हस्तक्षेप केला व पीडितेची साथ दिली, तेव्हा कुठे नराधम सासऱ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला.

 

पहिली मुलगी झाल्यावर सुरू झाले अत्याचार, दुसरीचा जन्म होताच वाढली टॉर्चरची तीव्रता

- ही घटना कानपूरच्या पनकीमधील आहे. येथील रहिवासी रामस्वरूप प्रियदर्शी उत्तर प्रदेशात डीआयजी पदावर होते. कुटुंबात पत्नी उमा आणि मुलगा आशिष आहे. 
- पीडिता म्हणाली, 'माजी डीआयजीचा एकुलता एक मुलगा आशिष याचे पहिले लग्न नेहा नावाच्या तरुणीशी झाले होते. तिला मुलगी झाल्याने तिचा छळ होऊ लागला, तेव्हा ती घर सोडून निघून गेली.'
- 'माझे (रश्मी - बदललेले नाव) माहेर मध्य प्रदेशात आहे. माझे पहिले लग्न एका जवानाशी झाले होते, परंतु त्याचे एका महिलेशी प्रेमसंबंध जुळल्याने त्याने मला टाकून दिले.' 
- 'वृत्तपत्रात लग्नाची जाहिरात पाहून या रिटायर्ड डीआयजी आणि माझ्या घरच्यांनी आमचे लग्न पक्के केले. 17 जून 2014 रोजी आमचे लग्न झाले होते.' 
- 'लग्नानंतर मला पहिली मुलगी झाली, तेव्हा सासू, सासरा आणि पतीने माझा छळ सुरू केला. येथूनच मारहाण आणि मानसिक छळाला सुरुवात झाली होती.' 
- '5 डिसेंबर 2016 रोजी दुसऱ्या मुलीला जन्म दिला, मग तर घरात भूकंपच आला. माझ्यावर होणाऱ्या अत्याचारात प्रचंड वाढ झाली. 
- 'मला दोन्ही मुलींसकट माहेरी हाकलून लावले. 6 महिन्यांनी मी जेव्हा सासरी आले, तरीही अत्याचार काही कमी नाही झाले. दिवस-दिवस मला अन् माझ्या मुलींना उपाशी ठेवले जात होते. आम्ही तिघी शेजाऱ्यांकडे मागून पोट भरायचो. पती, सासरा आणि सासू दररोज मारहाण करायचे.

 

2 मुली झाल्यानंतर सासरा म्हणाला- माझा मुलगा नामर्द, माझ्याशी ठेव संबंध
- पीडिता म्हणाली, सासऱ्याला कुटुंब वाढवण्याची चिंता सतावू लागली. माझ्यावर दबाव टाकू लागले की, वंश कसा वाढेल. जर तू राजी झालीस तर मी तुझ्याशी संबंध ठेवून मुलगा जन्माला घालू शकतो. माझा मुलगा नामर्द आहे, मुलगा जन्माला घालण्यात तो सक्षम नाही.
- तो माझ्यावर शारीरिक संबंधांसाठी दबावू टाकू लागला. या सर्व गोष्टी माझी सासू आणि पतीलाही माहिती होत्या.
- मागच्या 26 जून रोजी सासऱ्याने माझ्यावर बलात्कार केला. मी मोठमोठ्याने ओरडले, पण मदतीसाठी कुणीच आले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी सासऱ्याचे कृत्य सांगू लागले तेव्हा उलट त्या सर्वांनी मला अन् माझ्या चिमुरड्या मुलींना बेदम मारून घराबाहेर हाकलले.
- मी याची माहिती पोलिसांना दिली, परंतु सासऱ्याचे दबदबा असल्याने कुणीच मदत केली नाही.
- काही स्थानिक लोक आणि सामाजिक संघटना माझ्या मदतीसाठी पुढे आले तेव्हा सासऱ्याने त्यांच्याविरुद्ध खटला दाखल केला. परंतु, पोलिसांवर जेव्हा दबाव वाढला, तेव्हा कुठे माझी तक्रार दाखल होऊ शकली.

 

काय म्हणतात पोलिस?
- पनकी पोलिस स्टेशन इंचार्ज शेषनारायण पांड़े म्हणाले, हा कौटुंबिक विवाद आहे. यात महिलेच्या तक्रारीवरून सासऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- महिलेच्या सासऱ्याच्या तक्रारीवरूनही केस दाखल आहे. सासऱ्याने सुनेला काही जणांनी भडकावल्याचा आरोप केला आहे. दोन्ही प्रकरणांची चौकशी केली जात आहे.