आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Triple Talaq: पतीने दिला तलाक, मग सासऱ्याने सुनेला दिली सोबत राहण्याची ऑफर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बरेली (यूपी) - सरकारच्या प्रयत्नांनंतरही तीन तलाकची प्रकरणे संपवण्याची चिन्हे नाहीत. उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातूनही असेच एक प्रकरण समोर आले आहे. ज्या महिलेला तिच्या पतीने सोबत राहण्यास नकार दिला आहे, तिला तिच्या सासऱ्याने सोबत राहण्याची ऑफर दिली आहे.

 

बरेली जिल्ह्यातील कांशीराम कॉलनीतील रहिवासी एका महिलेशी पतीने आधीपासूनच विवाहित असल्याची बाब लपवून निकाह केला. त्यानंतर पत्नी गर्भवती झाल्यावर तिला मारहाण करून घराबाहेर हाकलून लावले. महिलेने जेव्हा माहेरातून परत आणण्यासाठी पतीला सारखा तगादा लावला, तेव्हा त्याने फोनवर तिला तीन तलाक दिला. 

 

यादरम्यान, महिलेने एका कन्यारत्नाला जन्म दिला. मुलगी जन्मल्याने ती जेव्हा सासरी पोहोचली तेव्हा शौहरने तिला स्वीकारायला नकार दिला. पतीसमोर हात जोडून विनवणी केली तरीही त्याचे हृदय पाझरले नाही. यावर सासरा म्हणाला की, तो तर तुला सांभाळणार नाही, माझ्यासोबत राहा. यानंतर पीड़ितेने एसएसपी ऑफिसात धाव घेतली. सध्या पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. अधिकारी म्हणतात की, सविस्तर तपासानंतर दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल.

 

 

बातम्या आणखी आहेत...