आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • मुलीच्या प्रेमप्रकरणामुळे नाराज होता बाप, झोपेतच कुऱ्हाडीचे वार करून केली हत्या Father Kill His Daughter In Anoopgarh

मुलीच्या प्रेमप्रकरणामुळे नाराज होता बाप, झोपेतच कुऱ्हाडीचे वार करून केली हत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनुपगड - राजस्थानात मुलीच्या प्रेमप्रकरणामुळे नाराज असलेल्या वडिलांनी तिची हत्या केली.  ही घटना श्रीगंगानगरमधील अनुपगढच्या गावातील आहे. शनिवारी सकाळी जेव्हा मुलगी गाढ झापेत होती, तेव्हा नाराज वडील तिथे कुऱ्हाड घेऊन पोहोचले आणि मुलीवर वार केले. घटनास्थळीच मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. घरातील आरडाओरड ऐकून आसपासच्या लोकांनी धाव घेतली आणि हे दृश्य पाहून पोलिसांना माहिती कळवली. पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. मृत मुलीचे नाव परमजीत कौर (19) होते. 

 

कुऱ्हाडीने केले डोक्यावर अन् पोटावर वार
- पोलिसांनी सांगितले की, शनिवारी जेव्हा मुलगी रूममध्ये झोपलेली होती. तेव्हाच तिचे वडील बलवीर कुऱ्हाड घेऊन तेथे पोहोचले. परंतु, यादरम्यान मृत मुलीच्या आईने त्यांना पाहिले आणि रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु संतप्त बलवीरने त्यांना धक्का दिला आणि मुलीवर कुऱ्हाडीचे घाव घातले. यामुळे जागेवरच परमजीतचा मृत्यू झाला.

 

प्रियकरासोबत पळून गेली होती मुलगी
पोलिसांनी सांगितले की, परमजीत काही दिवसांपूर्वी गावातच राहणाऱ्या एका तरुणासोबत पळून गेली होती. कुटुंबीयांनी पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी दोघांना पकडून कुटुंबीयांना याची माहिती दिली होती. यावर परमजीतचे लवकरात लवकर लग्न लावण्याचे तिच्या घरच्यांनी ठरवले होते. या घटनेमुळे मुलीचे वडील रागात होते. त्याने घरी आणल्यापासून मुलीशी बोलणेसुद्धा बंद केले होते. 

बातम्या आणखी आहेत...