आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगा हवा होता म्हणून नकोशा झालेल्या मुलीचा पित्याकडून खून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बलरामपूर- मुलगाच हवा म्हणून माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो याबद्दल अंगावर शहारे आणणाऱ्या घटना नजरेस पडतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील आहे. बलरामपूर येथे मुलगा हवा होता म्हणून नकोशा झालेल्या एक महिन्याच्या निष्पाप बाळाचा बापानेच जीव घेतला.  या हत्येचा जाब विचारणाऱ्या पत्नीला पतीने आणि तिच्या सासरच्या लोकांनी मारहाण केली.  


अतिरिक्त पोलिस अधीक्षक शैलेंद्रकुमार सिंग यांनी सांगितले, ही घटना सोमवारी घडली. राजेश चौहान याचा विवाह तीन वर्षांपूर्वी संगीताशी झाला होता. एक महिन्यापूर्वी त्यांना एक मुलगी झाली. 


राजेश आणि तिच्या सासरच्यांना मुलगा हवा होता. यावरून नवरा-बायकोत भांडणे हाेत असत. राजेशने तिला मारझोडही केली होती. संगीता सोमवारी काही कामानिमित्त बाहेर गेली होती. थोड्या वेळानंतर ती घरी परतली तेव्हा तिला बाळ मृतावस्थेत सापडले. तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली तेव्हा राजेश व तिच्या सासरच्या मंडळींनी मारहाण सुरू केली. त्यांनी तिला घरी कोंडून ठेवले अाणि मुलीला जमिनीत पुरले.  


संगीताने घरातून पळ काढला आणि पोलिस अधीक्षकांना सर्व घटना सांगितली. राजेश आणि सासरच्या तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांनी मृतदेह उकरून ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.

बातम्या आणखी आहेत...