आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • रिसेप्शनमध्ये भोजनावेळी प्लेट मिळाली नाही म्हणून हाणामारी Fight Over Shortage Of Plates At Wedding In UP

उत्तर प्रदेश: लग्नाच्या रिसेप्शनमध्ये भोजनावेळी प्लेट मिळाली नाही म्हणून हाणामारी, 20 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बलिया (उत्तर प्रदेश) - लग्न समारंभातील भोजनावेळी प्लेट मिळवण्यासाठी होणारी कसरत तुम्ही पाहिली असेल. मात्र येथील विक्रमपुर भागात प्लेट न मिळाल्याच्या शुल्लक कारणावरुन एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. प्लेटसाठी झालेल्या भांडणात 5 जण जखमी झाले आहेत. 

 

पोलिसांच्या माहितीनुसार, वऱ्हाडींना सुरुवातीला स्नॅक्स देण्यात आले होते. त्याचवेळी वरपक्षाचे काही लोक आले. त्यांना प्लेट्स मिळाल्या नाही, त्यामुळे ते संतप्त झाले. यावरुन वर आणि वधू पक्षातील लोकांमध्ये सुरुवातील शाब्दिक वाद झाला आणि तो तत्काळ हाणामारीत बदलला. 
या भांडणात 20 वर्षीय विशालचा मृत्यू झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...