आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्याच्याविरुद्ध वडिलांनी केली रेप केस, तरुणीने त्याच्याशीच केले लग्न, मुलगाही झाला, 5 वर्षांनी कोर्टाने ठोठावली 7 वर्षांची कैद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोगा (पंजाब) - बुधवारी मोगामध्ये अनोखे प्रकरण समोर आले. एका अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मुलाने रेप केला. मुलीच्या बापाने केस दाखल केल्यावर त्याला अटक झाली. जामिनावर सुटल्यावर मुलीला त्याच्याशी प्रेम झाले. काही दिवस प्रेमप्रकरण फुलत राहिले. मग दोघांनी मिळून 4 जुलै 2017 रोजी कोर्टात लग्न केले. 

 

5 वर्षांनंतर कोर्टाने सुनावली शिक्षा...
- लग्नानंतर दोघेही पती-पत्नी आनंदाने राहू लागले. दोघांना एक मुलगाही झाला आहे. दरम्यान, मुलीच्या वडिलांनी 2013 मध्ये दाखल केलेली रेप केस कोर्टात सुरूच होती.
- अनेक वेळा मुलीने आपल्या पतीच्या बाजूने कोर्टात साक्ष दिली, परंतु ती कामी आली नाही. 
- बुधवारी 5 वर्षे जुन्या प्रकरणात अॅडिशनल सेशन जज यांनी अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याप्रकरणी आरोपी तरुणाला दोषी ठरवत 7 वर्षांची कैद व 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला.

 

लग्नाचे आमिष दाखवून रेप केल्याचा गुन्हा दाखल केला होता बापाने...
पोलिसांनी 2013 मध्ये पलविंदर अन् त्याची आई जसविंदर कौरवर 17 वर्षीय मुलीला पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी दोघांनाही शोधून काढले. मग मेडिकल केल्यावर कोर्टात 164 चे जबाब नोंदवून तरुणावर बलात्काराचे कलमही लावले. पलविंदरला कोर्टाने तुरुंगात पाठवले.

 

कोर्टाने पीडित मुलीचे म्हणणेही ऐकले नाही...
24 ऑगस्ट 2015 रोजी रेपचा आरोपी पलविंदर सिंह याला कोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर त्या दोघांमध्ये पुन्हा प्रेम फुलले. यादरम्यान दोघांनी 4 जुलै 2017 रोजी कोर्ट मॅरेज केले. परंतु कोर्टात केस सुरूच होती, कारण केस मुलीच्या वडिलांनी दाखल केली होती. जेव्हा केस दाखल झाली होती, तेव्हा मुलगी अल्पवयीन होती. दुसरीकडे, मुलीने कोर्टात पतीची बाजू घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु कोर्ट तिच्या म्हणण्याशी सहमत झाले नाही. 

 

बातम्या आणखी आहेत...