आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जोधपूर - बलात्काराच्या गुन्ह्यात आजन्म कारावासाची शिक्षा झालेल्या आसारामने गुरुवारी येथील सेंट्रल जेलमध्ये पहिला दिवस उपवास केला. गेल्या साडेचार वर्षांमध्ये प्रथमच त्याला आश्रमातील जेवण आले नाही. जेल मेन्यूप्रमाणे गुरुवारी दुधी भोपळा भाजी, मठाची उसळ आणि चपाती असे पदार्थ तयार केले गेले होते. आसारामने एकादशीचा व्रत असल्याचे सांगत या अन्नाला स्पर्ष केला नाही. तुरुंग नियमानुसार ज्या कैद्यांना शिक्षा होते त्यांना तुरुंगातील अन्न घ्यावे लागते. काही विशेष परिस्थितीमध्येच कोर्ट कैद्याच्या मागणीनुसार घरचे जेवण मागवण्याची परवानगी देऊ शकते. दुसरीकडे, पीडिता आणि तिच्या वडिलांनी म्हटले आहे, की न्याय मिळाल्यामुळे कुटुंबाने पाच वर्षांत प्रथमच सुखाची झोप घेतली.
शिल्पीलाल शिलाईचे काम, शरदच्या हाताला अजून काम नाही
- आसारामसोबत षडयंत्र रचणारी शिल्पी उर्फ संचिता गुप्ता कैदी नंबर 76 हिला कपडे शिलाईचे काम देण्यात आले आहे. त्यासोबत ब्यूटी पार्लर आणि मेंदी लावण्याचे काम शिकून ती आत्मनिर्भर होऊ शकते.
- मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांकडून फॅक्ट्रीत काम करुन घेतले जाते. मात्र सध्याच्या स्थितीत या तुरुंगात एवढे काम नाही की प्रत्येक कैद्याच्या हाताला काम देता येईल. तुरुंगात कुलर तयार करण्याचा कारखाना आहे, मात्र जेव्हा ऑर्डर असेल तेव्हाच हा कारखाना सुरु होतो. त्यामुळे आसाराम आणि शरदचंद्र यांना सध्यातरी काही काम दिलेले नाही.
आसाराम जवळपास पाच वर्षांपासून जोधपूर सेंट्रल जेलमध्ये आहे. 2 सप्टेंबर 2013 रोजी त्याला तुरुंगातील सर्वात सुरक्षित वॉर्ड 2 मधील बॅरेक एकमध्ये ठेवले आहे. येथे तो रोज सकाळी पूजा-अर्चना करतो. त्यासाठी आसारामने बॅरेकच्या मागे तुळस आणि कपाशीचे रोप लावले आहे. आता जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर आसारामला तुरुंग परिसरातील झाडांना पाणी देणे व देखभालीचे काम दिले जाऊ शकते.
माझ्यासारख्या ब्रह्मज्ञानींसाठी लैंगिक शोषण पाप नाही
साक्षीदार राहुल सच्चरने आसारामची कुकृत्ये पाहिली होती. तेव्हा त्याने हटकले तर आसाराम म्हणाला होता, ब्रह्मज्ञानींसाठी लैंगिक शोषण पाप नाही. राहुलने खटल्यात साक्ष देताना हे सांगितले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.