आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात आधी गरीब-मागास समुदायाची चिंता करावी : राष्ट्रपती कोविंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुना - सरकारने सर्वात पहिल्यांदा गरीब व मागास समुदायाच्या कल्याणाचा विचार केला पाहिजे. या समुदायाची चिंता करायला हवी, असे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. मध्य प्रदेशात असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी आयोजित संमेलनात त्यांनी रविवारी मार्गदर्शन केले.  


राष्ट्रपतींनी केंद्र व राज्य सरकारच्या जनहिताच्या योजनांचे कौतुक केले. केंद्र तसेच राज्यातील शिवराजसिंह चौहान सरकार सर्व वर्गाच्या कल्याणाचा विचार करून याेजनांची अंमलबजावणी करत असल्याचे म्हटले. राष्ट्रपतींच्या हस्ते याप्रसंगी विविध क्षेत्रांतील लाभार्थींना प्रमाणपत्र प्रदान केले. याप्रसंगी मुख्यमंत्री चौहान म्हणाले, राज्यातील कोणताही माणूस भुकेला राहता कामा नये याची चिंता सरकारने केली आहे.  देशाचे राष्ट्रपती गुना जिल्ह्यात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

बातम्या आणखी आहेत...