आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारा घोटाळा : दुमकी ट्रेझरी प्रकरणी लालू-जगन्नाथ यांच्यासह 31 आरोपींवर आज निर्णयाची शक्यता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जानेवारी 1996 मध्ये जवळपास 950 कोटी रुपयांचा चारा घोटाळा समोर आला होता. - Divya Marathi
जानेवारी 1996 मध्ये जवळपास 950 कोटी रुपयांचा चारा घोटाळा समोर आला होता.

रांची - चारा घोटाळ्याशीसंबंधीत दुमकी ट्रेझरी केसमध्ये सीबीआयच्या विशेष कोर्टात गुरुवारी निर्णय येण्याची शक्यता आहे. यामध्ये बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि जगन्नाथ मिश्र यांच्यासह 31 आरोपी आहेत. कोर्टाने 5 मार्चला या खटल्यातील सुनावणी पूर्ण केली होती. लालू यांच्यावर चारा घोटाळ्यात सहा खटले दाखल आहेत. तीन प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली असून सध्या ते रांची येथील बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृहात आहेत. 

 

काय आहे दुमकी ट्रेझरी प्रकरण? 
- दुमकी ट्रेझरीमधून डिसेंबर1995 ते जानेवारी 1996  पर्यंत बेकायदेशीररित्या 3.76 कोटी रुपये काढण्यात आले होते. या प्रकरणी सीबीआयने 11 एप्रिल 1996 मध्ये 48 आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. 11 मे 2000 रोजी पहिली चार्जशीट दाखल करण्यात आली होती. 

 

कोणाला होऊ शकते शिक्षा? 
- दुमका ट्रेझरी प्रकरणी लालू प्रसाद यादव, डॉ. जगन्नाथ मिश्र, माजी खासदार, आर.के. राणा, जगदीश शर्मा यांच्यासह 31 आरोपी आहेत. 

 

केव्हा उघड झाला घोटाळा? 
- जानेवारी 1996 मध्ये जवळपास 950 कोटी रुपयांचा चारा घोटाळा समोर आला होता. 
- 1990च्या दशकात चारा पुरवठ्याच्या नावाखाली सरकारी ट्रेझरीमधून अशा कंपन्यांना पैसे देण्यात आले ज्या अस्तित्वातच नव्हत्या. 

 

लालूंवर कोणता आरोप? 
- चारा घोटाळा झाला तेव्हा राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू यादव हे बिहारचे मुख्यमंत्री होते. झारखंड आणि बिहार तेव्हा विभक्त झालेले नव्हते. 
- मुख्यमंत्री असताना लालू यांच्याकडे अर्थखातेही होते. 
- त्यांच्यावर आरोप आहे की त्यांची पदाचा गैरवापर करत चौकशीसाठी आलेली फाइल 5 जुलै 1994 ते 1 फेब्रुवारी 1996 पर्यंत अडकवून ठेवली होती. 2 फेब्रुवारी 1996 ला चौकशीचे आदेश देण्यात आले. 

 

लालूंना या दोन प्रकरणात शिक्षा झाली... 
1) देवघर ट्रेझरी केस : लालू यादव (69) यांच्यासह 16 आरोपींना 6 जानेवारी 2017 रोजी साडेतीन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आील होती. त्यासोबत 10 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला होता. 
2) चाईबासा ट्रेझरी केस : 24 जानेवारी 2018 रोजी पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. 


1997 मध्ये पहिल्यांदा तुरुंगात गेले होते लालू 
- 1997 मध्ये लालू यादव यांना सर्वप्रथम न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. तेव्हा ते 137 दिवस तुरुंगात होते आणि राबडी देवी बिहारच्या मुख्यमंत्री झाल्या होत्या. 12 डिसेंबर 1997 रोजी लालू यादव तुरुंगातून बाहेर आले होते. 
- तुरुंगात जाण्याची दुसरी वेळ 28 ऑक्टोबर 1998 मध्ये लालूंवर आली होती. पाटण्याच्या बेऊर तुरुंगात ते गेले होते. यावेळी त्यांना जामीन मंजूर झाला होता. यावेळी फक्त एक दिवस तुरुंगात राहिले होते. 
- चाऱ्याच्या नावावर चाईबासा ट्रेझरीमधून 37 कोटी रुपये काढण्यात लालू यादव दोषी ठरल्यानंतर 2013 मध्ये त्यांना तुरुंगवास झाला होता. तेव्हा दोन महिने ते रांचीच्या तुरुंगात होते. 25 लाख रुपये दंडही झाला होता. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला होता. 

 

बातम्या आणखी आहेत...