आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समोरासमोर धडकल्यानंतर पेटल्या दोन कार, दरवाजा लॉक झाल्याने 4 जण जिवंत जळाले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपघात एवढा भीषण होता की, आजुबाजुचे लोकही जळत असलेल्या कारच्या जवळ जायला घाबरत होते. - Divya Marathi
अपघात एवढा भीषण होता की, आजुबाजुचे लोकही जळत असलेल्या कारच्या जवळ जायला घाबरत होते.

- दुसऱ्या कारमध्येही चारजण होते. त्यांना जखमी अवस्थेत सागर हलवण्याचा सल्ला देण्यात आला. 

- दोन्ही कार भोपाळमधील नंबरवर नोंदणी झालेल्या होत्या. 


भोपाळ - मध्य प्रदेशच्या विदिशा जिल्ह्यामध्ये रविवारी रात्री दो कारची समोरासमोर धडक झाली. त्यानंतर या कारने पेट घेतला. एका कारमधून तर लोक बाहेर निघाले पण भोपाळहून सागरला जात असलेल्या दुसऱ्या कारचा दरवाजा लृक झाल्याने त्या कारमध्ये असलेले चार लोक जिवंत जळाले. मृतांमध्ये दोन पुरुष, एक महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. 


कुठली आहे घटना.. 
- हे प्रकरण विदिशामधील विदिशा-सागर महामार्गावरील आहे. 
- ज्या कारचा दरवाजा लॉक झाला होता ती भोपाळच्या नारियल खेडा येथील रामदयाल प्रजापती यांच्या नावावरील आहे. 
- दुसरी कार भोपाळच्या जहांगीराबाद येथील सुल्तान यासीन यांच्या नावावरील आहे. 


मृतांची ओळख पटली 
मृतांमध्ये प्रवीण प्रजापती, मायाबाई प्रजापती, लक्ष्मीबाई चक्रवर्ती आणि मुन्नीबाई घोडा यांचा समावेश आहे. जखमींमध्ये जेनिफर खरे, प्रभांश खरे आणि इतर दोघांचा समावेश आहे. 


फायर ब्रिगेड पोहचण्यापूर्वी गावकऱ्यांनी विझवली आग 
हा अपघात रात्री 8 वाजता झाला. पण फायर ब्रिगेडची गाडी 9 वाजेनंतर पोहोचली. तोपर्यंत पोलिसांनी आजुबाजूच्या लोकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले होते. त्यासाठी सुमारे अर्धा तास लागला. पोलिसांच्या मते, एका कारचा पेट्रोल टँक फुटल्यामुळे आग भडकली होती, त्यामुळे लोक आग विझवायला घाबरत होते. 


गॅस किटमुळे आग लागल्याची शक्यता 
पोलिसांचे असे म्हणणे आहे की, साधारणपणे गाड्यांची धडक झाल्याने एवढी भीषण आग लागत नाही. एका कारमध्ये गॅस किट असू शकते. त्यामुळे आग भडकली असेल. पण खरे कारण तपासानंतरच समोर येईल असेही पोलिस म्हणाले. 

 

 

बातम्या आणखी आहेत...