आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलअाेसीवर 2 पाक सैनिक ठार, पाकच्या हल्ल्यात दाेन भारतीय जवान जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - जम्मू-काश्मीरलगत नियंत्रण रेषेवर भारतीय जवानांनी पाकच्या गोळीबाराला दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे २ जवान ठार झाले. राजौरी जिल्ह्यात पाकने चालवलेल्या सततच्या गोळीबाराला उत्तर देताना भारताने कारवाई केली.
 
दरम्यान, पाकच्या हल्ल्यात २ जवान व २ नागरिक जखमी झाले. पाकने भारतीय लष्करी छावण्यांसह निवासी भागांत तोफगोळ्यांचा मारा केला. यात ६ घरांचे नुकसान झाले. जम्मूसह ईशान्येकडील राज्यांत लष्कराच्या विशेषाधिकारावर फेरविचाराचा किंवा तो काढून घेण्याचा प्रस्ताव नसल्याचे संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे.
 
जवान चोख प्रत्युत्तर देत आहेत : संरक्षण मंत्री
पाकिस्तान युद्धबंदीचे उल्लंघन करून सतत गोळीबार करत असला तरी भारतीय जवान चोख प्रत्युत्तर देत आहेत. भारतीय जवान दक्ष असल्याने घुसखोरीलाही आळा बसला असल्याचे संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...