आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Facebook Live करून पळवत होते बाइक, समोरून आला मृत्यू; दोघेही ठार, 13 जण जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कांकेर - फेसबूक लाइव्ह करून हायवेवर बाइक पळवणे दोन जिवगल मित्रांना जिव्हारी गेले आहे. सोशल मीडियावर लाइव्ह व्हिडिओ करत असताना त्यांच्या मित्रांनी कॉमेंट करून तसे न करण्याचे वारंवार आवाहन केले. तरीही त्यांनी काहीच ऐकूण घेतले नाही. सगळ्या कॉमेंटवर दुर्लक्ष करून ते सुसाट बाइक पळवत होते. त्याचवेळी अचानक समोरून येणाऱ्या खासगी प्रवाशी बसला त्यांची बाइक धडकली. या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्याने उपचार सुरू असताना जग सोडले. या दुर्घटनेत त्या बसमध्ये असलेले 13 प्रवासी सुद्धा जखमी झाले आहेत. 


- छत्तिसगडच्या जगदलपूर येथे राहणारा मुरली निषाद आपला मित्र मनीषसोबत बाइकवर निघाला होता. त्याचवेळी दोघांनी फेसबूकवर लाइव्ह होऊन व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. 
- यात सर्वप्रथम एका मित्राने विचारले कुठे जात आहात. तर दुसऱ्याने त्यांचे कौतुक केले. परंतु, जे.डी. सिंह नावाच्या एका व्यक्तीने त्यांना तसे करण्यापासून थांबण्याचे आवाहन केले. 
- यानंतर दुसऱ्या एका मित्राने स्माइली पाठवला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आयटीआय जवळ असलेल्या नॅशनल हायवेवर त्यांची बाइक बसला जाऊन धडकली. यात मनीषचा जागीच मृत्यू झाला. 
- या दोघांनी आपलाच नव्हे, तर इतरांचा जीव सुद्धा धोक्यात टाकला. त्यांची बाइक ज्या बसला धडकली त्यातील कंडक्टरसह 13 जण जखमी झाले. त्या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बस आणि बाइकच्या अपघातानंतर चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस झाडा-झुडुपांमध्ये जाऊन आदळली. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, या घटनेचा व्हिडिओ...

 

बातम्या आणखी आहेत...