आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • गामा पैलवान जन्मदिन विशेष: Gama The Undefeated Great Indian Wrestler

असा पहिलवान जो कधीच हरला नाही, 6 गावरान चिकन, 10 लिटर दूध, अर्धा किलो तूप अन् सव्वा किलो बदामाचा खुराक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतसर - भारतीय इतिहासातील महान पहिलवान राहिलेले गुलाम मोहम्मद बक्श यांचा 22 मे हा जन्मदिन आहे. कुस्तीच्या रिंगमध्ये ते 'द ग्रेट गामा' नावाने ओळखले जात होते. असे पहिलवान ज्यांनी आयुष्यात एकही कुस्ती हरलेली नाही. असे म्हणतात की, ब्रूस लीसुद्धा गामामुळे प्रभावित होता. त्यांच्यापासून इम्प्रेस होऊन ब्रूस लीनी शरीरयष्टी कमावली होती. दिवसाला 5,000 बैठका और हजारहून जास्त दंड काढणे गामा पहिलवान यांचे रूटिन होते. याशिवाय डाएट एवढी होती की तुम्ही विचारही करू शकणार नाहीत. 

 

जाणून घ्या, अपराजित गामा पहिलवानबाबत...

- गामा पहिलवान यांच्या जन्माबद्दल वाद आहे. काही मानतात की, 1889 मध्ये ते मध्यप्रदेशच्या दतिया (होलीपुरा) मध्ये जन्मले होते.
- तर काहींचे मानणे आहे की, त्यांचा जन्म 1880 मध्ये पंजाबच्या अमृतसरमध्ये झाला होता. त्यांच्याबाबत म्हटले जाते की, ते 80 किलो वजनी हंसली (दगडाने बनलेली वस्तू, जी गळ्यामध्ये घालायचे) सोबत उठबशा काढायचे.
- याशिवाय त्यांचा जो डंबेल होता, तो इतर कुणी उचलणे महाकठीण होते. तो एकदम अवजड दगडाचा वापर डंबेल वापरायचे. (दतियाच्या म्युझियममध्ये आजही त्यांचे जतन केले जात आहे.)

 

अशी होती गामा पहिलवानची डाएट
- गामा पहिलवानच्या डाएटमध्ये 6 गावरान चिकन, 10 लिटर दूध, अर्धा किलो तूप आणि सव्वा किलो बदामच्या टॉनिकचा समावेश होता.
- असे सांगतात की, त्यांच्या आहाराचा खर्च तत्कालीन राजा भवानी सिंह उचलत होते. गामाने 10 वर्षे वयापासूनच पहिलवानी सुरू केली होती.
- जोधपुरात कुस्तीची स्पर्धा झाली होती, ज्यात देशभरातील हजारो कुस्तीपटूंनी भाग घेतला होता. यात गामा पहिलवान यांनी सहभाग नोंदवला होता. तेव्हा त्यांचे वय फक्त 10 वर्षे होते.

 

असे बनले वर्ल्ड चॅम्पियन
- गामा यांनी आपल्या आयुष्यात देशासोबतच विदेशातील 50 प्रसिद्ध पहिलवांना अस्मान दाखवले. 
- गामा पहिलवान यांनी देशांत कीर्तिमान प्रस्थापित केले, परंतु त्यांना खरी ओळख लंडनमध्ये मिळाली. येथे जाताच त्यांनी तेथील दिग्गजांना आव्हान दिले.
- गामा यांनी त्याकाळच्या दिग्गज जैविस्को आणि फ्रेंक गॉचला आव्हान दिले. एवढेच नाही, त्यांना 9 मिनिटे 30 सेकंदांत चितही केले.

 

नंतर पाकिस्तान गेले
भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी ते आपल्या कुटुंबीयांसोबत लाहोरला गेले होते. मे, 1960 मध्ये लाहोरला त्यांचे निधन झाले.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, गामा पहिलवान यांचे आणखी काही फोटोज...  

बातम्या आणखी आहेत...