आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shocking: 5 तरुणींवर 6 जणांनी केला पाशवी गँगरेप; आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी जाहीर केले इनाम GangRap With Girl Activists In Khunti Girls Were Stooping Father Did Not Stop Miscreants

Shocking: 5 तरुणींवर 6 जणांनी केला पाशवी गँगरेप; आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी जाहीर केले बक्षीस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टॉपमन स्कूल- याच शाळेत 5 तरुणी नुक्कड नाटक दाखवण्यासाठी आल्या होत्या. (फाइल) - Divya Marathi
स्टॉपमन स्कूल- याच शाळेत 5 तरुणी नुक्कड नाटक दाखवण्यासाठी आल्या होत्या. (फाइल)

खूंटी (झारखंड) - येथील कोचांगमध्ये नाटक मंडळातील 5 तरुणींवर बलात्कार प्रकरणात पोलिसांनी शुक्रवारी दोन गुन्हे दाखल केले आहेत. एक केस अड़की आणि दुसरी खूंटीच्या महिला पोलिस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली आहे. स्टॉपमन मेमोरियल स्कूलचे प्रभारी आणि सचिव फादर अल्फान्सो आईंद यांच्याविरुद्धही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फादरवर आपल्या सिस्टर्सना वाचवणे, तरुणींना बलात्काऱ्यांसोबत जाण्यास न रोखणे आणि पोलिसांना माहिती न कळवण्याचा आरोप आहे. सोबतच, पोलिसांनी 4 ते 5 अज्ञात व्यक्तींविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे, एका पीडितेने दैनिक भास्करला सांगितले की, आम्ही हात जोडून विनवू लागलो होतो, माफीही मागितली की आता या गावात पुन्ह कधीच येणार नाही. परंतु ते थांबले नाहीत. फादरनेही आमची मदत केली नाही. त्यांनी फक्त सिस्टरला वाचवले.

 

पोलिस म्हणाले- फादरने वाचवले नाही:
खूंटीचे एसपी अश्विनी सिन्हा म्हणाले- "पोलिसांनी शुक्रवारी कोचांग येथील शाळेत जाऊन तपास केला. फादर अल्फान्सो आईंद यांच्यासह 3 जणांची चौकशी करण्यात आली. पोलिसांच्या चौकशीत समोर आले की, आरोपी सिस्टर्सना घेऊन जात होते, तेव्हा फादर त्यांना म्हणाले की, या सिस्टर आहेत, यांना नेऊ नका. दुसरीकडे, लोकांमध्ये जनजागृतीसाठी आलेल्या नाटक मंडळातील तरुणी विनवणी करत होत्या, परंतु फादरने त्यांना वाचवले नाही."

 

पीडितेची आपबीती: 


नराधमांनी वारंवार दुष्कर्म केले... आम्ही रडलो तर नाजुक अंगांमध्ये पिस्टल, लाकूड... खैनी टाकली

 

5 बाइकस्वार तरुणांनी आम्हाला घेरले: 

"मंगळवार, 19 जून रोजी दुपारी 12.30 वाजता आम्ही मुली कोचांग येथील स्टॉपमन मध्य विद्यालयात मुलांसमोर नुक्कड़ नाटक सादर करत होतो. अजून 15 मिनिटेच झाली असतील, की 2 बाइकवर स्वार होऊन 5 जण तेथे पोहोचले. त्या सर्वांचे वय 25 च्या जवळपास होते. एका मुलाने इशारा करून नाटक थांबवण्यासाठी सांगितले आम्हाला त्याच्याजवळ बोलावले. तेथे फादर आणि 2 सिस्टर साध्या वेशात होते. बाइकवरून ओलल्या तरुणांनी आम्हाला घेरले. चौकशी करू लागले की, कुठून आला आहात, काय करत आहात."

 

फादर व दोन्ही सिस्टर राहिल्या गप्प: 
"ते म्हणाले, पोलिसांसाठी हेरगिरी करता, पोलिसांनीच तुम्हाला इथं पाठवलंय. आम्ही म्हणालो- आमचे काम फक्त लोकांना जागरूक करणे आहे. याबदल्यात आम्हाला पैसे मिळतात. एवढे ऐकताच 3 तरुणांनी पिस्टल काढले आणि धमकावून गाडीत बसण्यासाठी सांगितले. म्हणाले- आम्ही चौकशी करू की, तुम्ही पोलिसांची माणसे आहात अथवा नाही, तेव्हाच सोडू. आम्ही विरोध केल्यावर म्हणाले गोळ्या झाडू. तुम्हाला माहिती नाही की, या एरियात न विचारता येण्याची परवानगी नाही. या भागात आमच्या आदेशाशिवाय सरकारसुद्धा येऊ शकत नाही. यादरम्यान फादर आणि दोन्ही सिस्टर गप्प होते."

 

फादर म्हणाले की, शी इज नन, त्यांना सोडा: 
"बाहेर पाहिले तर एक लाल आणि एक निळ्या रंगाची बाइक होती. नंबर प्लेटवर कागद चिकटवलेला होता. आरोपींनी आम्हाला त्याच गाडीत बसण्यासाठी सांगितले, ज्यातून आमची टीम तेथे पोहोचली होती. एका तरुणाने तेथे उभ्या दोन्ही सिस्टर्सनाही गाडीत बसण्यासाठी सांगितले. तेवढ्यात तेथे उभ्या फादरने त्यांना सांगितले की, शी इज नन, त्यांना सोडा. बाइकवरून आलेला तरुण आता स्वत: आमची गाडी चालवू लागला. एक बाइक गाड़ीच्या पुढे आणि एक मागे चालत होती."

 

2 तरुणांनी आमच्यावर पिस्तूल ताणले:
शाळेतून निघाल्यावर अर्ध्या तासाने आम्ही जंगलात पोहोचलो. तेथे पोहोचल्यावर आमच्या पुरुष साथीदाराला गाडीत बसवण्यात आले. आम्हा 5 जणींना काही अंतरावर जंगलात नेण्यात आले. यानंतर तेथे गेल्यावर मारहाण करून कपडे काढायला सांगितले. आम्ही त्यांना हात जोडून विनवू लागलो, माफीही मागितली की, आता या गावात कधीही येणार नाहीत. 2 तरुणांनी आमच्यावर पिस्तूल ताणली आणि धक्का देऊन दोघींना जमिनीवर पाडले. बळजबरी कपडे उतरवले. यानंतर त्यांनी पाशवी क्रौर्याचा कळस गाठला. सर्वजण आमच्यावर तुटून पडले आणि दुष्कर्म करायला सुरुवात केली. आमच्या रडण्याचाही त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही."

 

4 तास त्यांनी जनावरांसारखे तोडले अब्रूचे लचके: 
"वेदनांमुळे आम्ही सगळ्या जणी विव्हळत होतो, तेवढ्यात एका तरुणाने झाडाची एक फांदी तोडली आणि एका तरुणीच्या नाजूक अंगात टाकली. एकाने माझ्या नाजूक अंगात पिस्तूल घातले. जवळच उभा दुसरा तरुण खैनी तयार करत होता, त्याने माझ्या अंगात खैनी टाकली. तब्बल 4 तास त्यांनी जनावरांपेक्षाही क्रूर छळ केला. यादरम्यान, त्यांनी आमच्याच मोबाइलवरून आमचा व्हिडिओ बनवला आणि फोटो काढले.

 

आमच्या साथीदारांना थुंकी चाटायला लावली:
आमच्यासोबत जे पुरुष साथीदार होते, त्यांना बेदम मारहाण केली आणि म्हणाले की, थुंकी चाटा, म्हणजे पुन्हा येथे येण्याची हिंमत होणार नाही. ते म्हणाले, तुम्हा लोकांना धडा शिकवणे गरजेचे होते, जेणेकरून येथे येण्याआधी पोलिसांचाही थरकाप होईल. यानंतर आम्हाला गाडीत बसवले आणि शाळेजवळ नेऊन सोडले. आम्ही शाळेत जाऊन सर्व बाब फादर आणि सिस्टरना सांगितली. ते म्हणाले की, येथेच सगळं विसरून जा. ही गोष्ट बाहेर गेली तर मीडियात पसरेल. पोलिसांना कळाल्यावर ते तुम्हालाच परेशान करतील आणि आरोपींना जर माहिती मिळाली, तर तुमचा जीवही जाऊ शकतो. सिस्टरने आम्हाला गाडीत बसवले आणि आम्ही सर्व खूंटीला आलो. मी एवढी हादरले होते की, घरात येऊन स्वत:ला रूममध्ये बंद करून घेतले. आत्महत्या करण्याचे विचार येत होते. परंतु हिंमत करून दुसऱ्या दिवशी ही बाब एका दीदीला सांगितली. त्यांनी धीर दिला आणि याची माहिती एका मोठ्या पोलिस अधिकाऱ्याला दिली.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, अवघ्या देशाला हादरवून टाकणाऱ्या या प्रकरणाचे Photos...  

 

बातम्या आणखी आहेत...