आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीचा गँगस्टर मुन्ना बजरंगीची तुरुंगात हत्या, 10 दिवसांपूर्वी पत्नीने म्हटले होते बनावट एन्काउंटर होऊ शकते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बागपत - उत्तर प्रदेशचा गँगस्टर प्रेम प्रकाश ऊर्फ मुन्ना बजरंगीची (51) सोमवारी बागपत तुरुंगात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. माजी बसपा आमदार लोकेश दीक्षित यांना खंडणी मागितल्याच्या आरोपावरून कोर्टात हजर करण्यासाठी बजरंगीला झांशीवरून बागपतला आणण्यात आले होते. बजरंगीवर हत्या आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल होते. जिल्हा कारागृहात जेव्हा शिरगणती झाली, तेव्हा कळले की बजरंगीची हत्या झाली आहे. बजरंगी हा भाजपा आमदार कृष्णानंद रायच्या हत्येचाही आरोपी होता.

 

सूत्रांनुसार, कुख्यात सुनील राठी आणि विक्की सुनहेड़ा यांच्यासोबत त्याला वेगळ्या बराकीत ठेवण्यात आले होते. प्रमुख सचिव (गृह) अरविंद कुमार यांनी बजरंगीची हत्या झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, बागपत जेलचे जेलर, डेप्युटी जेलरसहित 4 कर्मचाऱ्यांना सस्पेंड करण्यात आले आहे. ज्यूडिशियल एन्क्वायरीचेही आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, दोषींविरुद्ध कडक कारवाई होईल.

 

9 वर्षांपूर्वी झाली अटक: 
मुन्ना बजरंगीचे खरे नाव प्रेमप्रकाश सिंह होते. 1967 मध्ये उत्तर प्रदेशातील जौनपुर जिल्ह्यातील पूरेदयाल गावात जन्मलेला मुन्ना याने इयत्ता 5वीनंतर शिक्षण सोडले. त्याला शस्त्रे जमवण्याचा छंद होता. गुन्हेगारी जगतात आपली ओळख बनवण्यासाठी बजरंगीने 1984 मध्ये दरोड्याच्या एका व्यापाऱ्याची हत्या केली. भाजप नेते रामचंद्र सिंह यांची हत्या करून पूर्वांचलात त्याने छाप सोडली आणि मग त्याने अनेकांच्या हत्या केल्या. बजरंगी भाजप आमदार कृष्णानंद राय यांच्या हत्येचाही आरोपी होता. भाजप आमदाराच्या हत्येशिवाय अनेक प्रकरणांत उत्तर प्रदेश पोलिस, एसटीएफ आणि सीबीआय मुन्ना बजरंगीचा शोध घेत होते. त्याच्यावर 7 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. 29 ऑक्टोबर 2009 रोजी दिल्ली पोलिसांनी मुन्नाला मुंबईच्या मलाड परिसरात अटक केली होती. मुन्ना झांशीच्या तुरुंगात जवळजवळ वर्षभरापासून कैदेत होता.

 

पत्नीने 10 दिवसांपूर्वी व्यक्त केली होती भीती: 
29 जून रोजी मुन्ना बजरंगीची पत्नी सीमा सिंहने जबाब दिला होता की, "मला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यापर्यंत माझे म्हणणे पोहोचवायचे आहे की, माझ्या पतीच्या जिवाला धोका आहे. त्यांना योग्य सुरक्षा पुरवली जावी. त्यांच्या बनावट एन्काउंटरचा कट रचला जात आहे. यूपी एसटीएफ आणि पोलिस अधिकारीच कट रचत आहेत की, त्यांना बनावट चकमकीत ठार केले जावे."

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos... 

 

बातम्या आणखी आहेत...