आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • General V.k. Singh Writes About Search Operation Of Dead Bodies Of Indian In Iraq

फोटो दाखवून विचारायचे, कुणी भारतीय आला होता का? वाचा, मोसूलमध्‍ये कसे शोधले मृतदेह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्यांनी मोसूलमध्ये मृतदेह शोधले, ते जनरल व्ही. के. सिंह (परराष्ट्र राज्यमंत्री) भास्‍करसाठी लिहितात...

 

२०१४ पासून इसिसच्या ताब्यात असलेले माेसूल शहर गतवर्षी ९ जुलैला मुक्त झाले होते. १० तारखेला मी मोसूलकडे रवाना झालो. मी तेथे पाेहोचलो तेव्हा युद्ध संपलेले नव्हते. जागोजागी भूसुरुंग पेरलेले होते. आयईडी लावलेले होते. कुर्दिश सैनिकांच्या मदतीने मी एरबिल सीमेवरून मोसूल पाहण्याचा प्रयत्न केला. मुक्कामासाठी जागाही नव्हती.

 

आमच्यासोबत आणखी ४ लोक होते. आम्हाला गव्हर्नरच्या पीएची खोली देण्यात आली. तेथे फरशीवर झाेपून रात्री काढल्या. पडताळणीदरम्यान आम्ही लोकांना भेटायचो. अपहृत भारतीयांचे फोटो दाखवून इकडे कुणी भारतीय आला होता का, असे विचारायचो. काही नकार द्यायचे, काही खाेटी उत्तरे देऊन दिशाभूल करायचे.


अद्याप धोका कायम असल्याचे सांगत तेथील लष्कराने आम्हाला माेसूलमध्ये जाऊ दिले नाही. तीन दिवसांनी आम्ही रिकाम्या हाताने परतलो. भूसुरुंग हटवले जात होते. पुढे पुन्हा ऑक्टोबर २०१७ मध्ये तेथे गेलो. रस्त्यावर तासन्तास फिरून लोकांशी संवाद साधला. टीव्ही-रेडिओवरही भारतीय दिसल्यास माहिती कळवण्याची सूचना दिली.

 

ज्या टेक्स्टाइल मिलमध्ये भारतीय काम करायचे, त्याच्या मालकालाही भेटलो. त्याने व तेथे भारतीयांना जेवण देणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, या लोकांना इसिसच्या अतिरेक्यांनी पाहिले होते. नंतर त्यांना पकडून तुरुंगात डांबण्यात आले. काही बांगलादेशीही सोबत होते. मात्र त्यांना सोडून देण्यात आले. त्यांच्यासोबतच हरजित मसीह हा भारतीय अली नावाने बांगलादेशी म्हणून पळून जाण्यात यशस्वी ठरला.


इसिसने नंतर या ३९ भारतीयांना बदूशमध्ये पाठवले. आम्हीही बदूशमध्ये गेलो. तेथे टेकडीवर सामूहिक कबरींची माहिती मिळाली. तेथे आम्ही ग्राउंड पेनिट्रेशन रडारची व्यवस्था केली. तपासणीत मृतदेहांची पुष्टी झाली. आम्ही प्रशासनाला टेकडी खोदण्यास सांगितले. तेथे जे अवशेष सापडले त्यात काहींचे केस लांब होते. हातात कडेही सापडले. मृतदेहांची संख्याही ३९ होती. मृतदेहांना बगदादमध्ये पाठवले. तेथे मार्टियर फाउंडेशनने डीएनए चाचणी घेतली. यानंतर आम्ही बेपत्ता लोकांच्या कुटुंबीयांच्या डीएनएचे नमुने मृतदेहांशी जुळवण्यास सुरुवात केली. सर्वात आधी संदीपकुमारचा डीएनए जुळला. सोमवारी रात्री ३८ डीएनए जुळले. एकाचा डीएनए ७०% जुळला. मी तीन वेळा इराकला गेलो. आधी ३ दिवस, नंतर ४ दिवस, यंदा जानेवारीत १ दिवसासाठी. ही मोहीम लष्करातील दिवसांची आठवण करून देते. तेव्हा टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी झोकून द्यायचो.

 

सरकारने सात वेळा देशाची दिशाभूल केली : काँग्रेस

सरकार ४ वर्षांपासून दिशाभूल करत आहे. सुषमा स्वराज यांनी पीडितांची माफी मागायला हवी. सरकारतर्फे सात वेळा सर्वजण जिवंत असल्याचे सांगण्यात अाले.  पहिल्यांदा २३ जून २०१४, १७ आणि २४ जुलै, २२ ऑगस्ट, त्यानंतर २२ जुलै २०१५ आणि १६ जूलै २०१७ रोजी यासंबंधीची माहिती दिली गेली.
- रणदीप सुरजेवाला, प्रवक्ते, काँग्रेस.

 

एका व्यक्तीच्या वक्तव्यावर सरकार निष्कर्षावर पोहोचलेले नाही. डीएनए तपासाच्या आधारावर मृतदेह भारतीय असल्याची खात्री करण्यात आली आहे.
- सुषमा स्वराज, परराष्ट्रमंत्री.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, इतके दिवस अंधारात का ठेवले? पीडितांच्या कुटुंबीयांचा प्रश्न 

 

हेही वाचा,

- इराकमध्ये 4 वर्षांपूर्वी अपहृत 39 भारतीयांचे अवशेष मिळाले, इसिसने केली होती सर्वांची हत्या

- याच शहरात मारले गेले 39 भारतीय, ISIS पासून मुक्तीनंतर अशी आहे अवस्था

 

 

बातम्या आणखी आहेत...