आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींची छाती कागदी, 70 वर्षांतील सर्वात कमकुवत सरकार; काश्मीर हल्ल्यांवर आझाद यांचे टीकास्त्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाराणसी - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 56 इंचाच्या छातीवरील वक्तव्यावर काँग्रेसने टीका केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधीपक्ष नेते गुलाम नबी आझाद म्हणाले, मोदी म्हणत होते की त्यांची छाती 56 इंचाची आहे. वास्तविक त्यांचा हा फार मोठा खोटा दावा आहे. 70 वर्षातील हे सर्वाधिक कमकुवत सरकार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आझाद यांनी हे वक्तव्य केले आहे. 2014च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान मोदींनी यूपीए सरकारवर टीका करताना पाकिस्तानविरोधात लढण्यासाठी 56 इंचाची छाती लागते असे वक्तव्य केले होते. 

 

आधीच्या सरकारच्या काळात काश्मीरवर हल्ले होत नव्हते
- आझाद सोमवारी म्हणाले, याआधीच्या सरकारच्या काळात जम्मू-काश्मीरवर हल्ले होत नव्हते. जम्मू-काश्मीरमध्ये भाजप-पीडीपी आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर हल्ले होत आहेत. 
- मोदींवर टीका करताना आझाद म्हणाले, त्यांची 56 इंचांची छाती एक मोठा खोटारडेपणा होता. त्यांची कागदी छाती आहे. 

 

योगी सरकारमध्ये दलित-अल्पसंख्यांक असुरक्षित 
- आझाद म्हणाले, योगी सरकारमध्ये दलित आणि अल्पसंख्यांक व महिला सुरक्षित नाहीत. 
- मोदी सरकारच्या काळात देशात बेरोजगारी वाढली आहे. महागाईने उच्चांक गाठला आहे. शेतकरी आणि युवकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. 

बातम्या आणखी आहेत...