आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Live In मध्ये राहत होती, लग्न झाले नसल्याने घेतला गळफास, नोटमध्ये लिहिले सोडू नका नराधमाला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोटा - राजस्थानच्या कोटा शहरात एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आपल्या आत्महत्येचे कारण तिने सुसाइट नोटमध्ये लिहताना प्रिकराला जबाबदार धरले. आत्महत्येपूर्वी तिने लिहिल्याप्रमाणे, ती आपल्या प्रियकरासोबत लिव्ह इनमध्ये राहत होती. परंतु, त्या युवकासोबत आपले लग्न होईल असे तिचे स्वप्न होता. तिने प्रियकरावर मारहाण, अत्याचार आणि फसवणुकीचा आरोप लावला आहे. सोबतच, आपल्या प्रियकराला नराधमाची उपमा देत त्याला सोडू नका असे आवाहन केले. पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांकडे सुपूर्द केला. तसेच खटला दाखल करून तपास सुरू केला आहे. 

 

घरी येऊन केली आत्महत्या

पोलिस अधिकारी अमर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष नगर येथील वॅम्बे योजना निवासी नंदू आणि सुभाष नगर येथील रहिवासी ज्योति वर्मा (21) एकमेकांना 5 वर्षांपासून ओळखत होते. ते आधी एकमेकांचे शेजारी होते नंतर दोघांमध्ये प्रेम जुळले. दोन वर्षांपूर्वी नंदूने कथितरित्या ज्योतीला लग्नाचे आश्वासन दिले होते. परंतु, लग्न होऊ शकले नाही आणि हे दोघे लिव्ह इनमध्ये राहत होते. दोघांनी लग्नाचा निर्णय सुद्धा घेतला होता. परंतु, नंदूने अचानक लग्न करण्यास नकार दिला असा आरोप आहे. तो रोज ज्योतीला मारहाण करत होता असा आरोपही तिने पत्रात लावला. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, ती जुलैच्या पहिल्याच महिन्यात नंदूला सोडून आपल्या कुटुंबियांसोबत राहायला आली होती. तेव्हापासूनच ती डिप्रेशनमध्ये होती. ज्योतीला 5 भाऊ-बहिणी आहेत. बुधवारी सकाळी बहिणी आईसोबत कामासाठी निघून गेल्या आणि भाऊ शाळेत गेला होता. त्याच दरम्यान ज्योतीने फासावर लटकून आत्महत्या केली. कुटुंबीय घरी परतले तेव्हा घरावर लोकांची गर्दी होती.


सुसाइट नोटमध्ये लिहिले...
पोलिसांना घरात दोन डायऱ्या सापडल्या आहेत. या दोन्ही डायऱ्यांमध्ये ज्योतीने आपबिती मांडली आहे. तिने लिहिले, तिचे नंदूवर खूप प्रेम आहे. त्याच्याशिवाय ती जगूच शकत नाही. नंदूचे देखील तिच्यावर प्रेम आहे. परंतु, अचानक नंदू बदलला. लग्नाचा विषय काढताच तो मारहाण करतो. दारू पिऊन येतो आणि यातना देतो. मी हा दगा सहन करू शकत नाही. नंदूने माझे आयुष्य नरक बनवले आहे. त्यामुळेच, मी या जगाचा कायमचा निरोप घेत आहे. पोलिसांसाठी तिने लिहिले, की नंदू एक नराधम आहे त्याला सोडू नका.

 

बातम्या आणखी आहेत...