आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरातून निघत होते धुराचे लोट, आत जाऊन पाहिले तर जळत होती ही तरुणी, आणि..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हापुड (युपी) - युपीच्या हापुड जिल्ह्यात एका तरुणीचा भाजल्याने संशयास्पद मृत्यू झाला आहे. घटनेच्या वेळी घरात कोणीही उपस्थित नव्हते. शेजाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. तरुणीचा मृतदेह पोस्ट मॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिस तपास करत आहेत. 


काय आहे संपूर्ण प्रकरण.. 
- परिसरातील नागरिकांना एखा घरातून धुराचे लोट बाहेर पडत असल्याचे दिसल्याने लोकांनी घराचे दार तोडले. 
- घरामध्ये आग लागलेली होती. ती विझताच बेडवर एक तरुणी जळत असल्याचे लोकांना दिसले. 
- घरामध्ये दुसरे कोणीही नव्हते. लोकांनी लगेचच या घटनेची माहिती पोलिसांना दिली. 
- पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच मुलीला हॉस्पिटलमध्ये हलवले, पण पोलिसांनी तपासून तिला मृत घोषित केले. 
- त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. 


कारण अद्याप गुलदस्त्यात.. 
- शेजारी श्याम सुंदर याने सांगितले की, एका जणाने आग लागल्याचे सांगितले तेव्हा आम्ही त्याठिकाणी पोहोचलो. आम्ही त्याठिकाणी पोहोचलो तर घरातून आगीचे लोट बाहेर पडत असल्याचे लक्षात आले. आम्ही अनेक लोकांनी एकत्र येत आग विझवली तर तरुणी जळत असल्याचे दिसले. 
- मुलीचा भाऊ रमेशने सांगितले की, ती घरी एकटी होती. कुटुंबीयांनी घटनेची माहिती दिली, पण आग लागण्यामागचे खरे कारण समजू शकले नाही. 

 

बातम्या आणखी आहेत...