आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CRIME: मित्राच्या बहिणीला पळवले, दोन महिन्यानंतर हत्या करून फेकले विहिरीत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पानीपत - हरियाणातील पानीपत शहरात एका 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला आहे. ती गेल्या 2 महिन्यांपासून बेपत्ता होती. कलंदर चौक परिसरात राहणारा आरोपी रॉकी शर्मा याने आपल्याच मित्राची बहिण दोन महिन्यांपूर्वी पळवून नेली होती. हा रॉकी शर्मा तोच आरोपी आहे, ज्याने मुलगी पळवण्यात मदत केली नाही म्हणून आपल्याच मित्रांवर हल्ले केले होते. त्या सर्व मित्रांनी आपली साथ सोडून त्या मुलीच्या भावाची साथ दिली असे त्याचे म्हणणे होते. रॉकीनेच आपल्या एका मित्राचे जिम जाळले आणि दुसऱ्या मित्राच्या गळ्यावर गनफायर केले. तसेच तो तिसऱ्यावर हल्ल्याच्या तयारीत होता. आता त्याने आपल्या कथित प्रेयसीचा खून केला आहे. 


काय आहे प्रकरण?
> पोलिस उपाधीक्षक जगदीप सिंग दूहन यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीव कॉलोनीचा राहणारा आरोपी रॉकी शर्माला अटक करण्यात आली आहे. त्याने पोलिस चौकशीत हत्येची कबुली दिली. 13 मे रोजी रॉकी आपला मित्र अरशदची बहिण घेऊन फरार झाला होता. तसेच दोन महिन्यांपासून तिच्यासोबत नरेला येथे एका खोलीत राहत होता. रॉकी पानीपतला परत येण्यास इच्छुक होता. परंतु, त्या तरुणीने त्यास नकार दिला. 
> 13 जुलै रोजी रॉकी तरुणीला बाइकवर फिरवण्याच्या बहाण्याने बाहेर घेऊन गेला. सोनीपतच्या नाहरी गावात हे दोघे रमेश नावाच्या एका मित्राच्या शेतावर पोहोचले. एका विहिरीजवळ चर्चा करताना रॉकीने तिला पुन्हा पानीपतला परतण्यास विचारले. परंतु, त्या मुलीने रॉकीला पुन्हा नकार दिला. यावर भडकलेल्या आरोपीने तिच्या डोक्यात गोळी घातली. घटनास्थळीच मृत्यूमुखी पडलेल्या तरुणीचा मृतदेह त्याने त्याच विहिरीत फेकले आणि पानीपतला परतला. पोलिसांना अजुनही रॉकीच्या जबाबावर विश्वास नाही. त्यामुळे, त्याची कसून चौकशी केली जात आहे. 


अशी झाली होती मैत्री...
अरशदचे वडील मूळचे मुझफ्फरनगर येथील रहिवासी आहेत. तो गेल्या 20 वर्षांपासून पानीपतमध्ये आपल्या कुटुंबियांसोबत राहत होता. याच ठिकाणी अरशद आणि रॉकी शर्माची जिममध्ये मैत्री झाली. रॉकी आणि अरशद एकाच कॉलनीत राहत होते. त्या कॉलनीत रॉकीचे एक सौंदर्य प्रसाधनांचे दुकान होते. त्या दुकानावर रॉकी आणि अरशदच्या बहिणीची मैत्री झाली होती. 


असा लागला आरोपीचा छळा
रॉकी शर्मा तरुणीचा खून करून घटनास्थळावरून पसार झाला. यानंतर त्याने आपल्या इतर सहकाऱ्यांसोबत त्याच दिवशी राजन नावाच्या एका मित्राला गोळी मारली होती. लोक जेव्हा शेतावर पोहोचले तेव्हा त्यांना विहिरीत तरुणीचा मृतदेह दिसून आला. त्यांनीच फोन करून पोलिसांना घटनास्थळी बोलावले. पोलिसांनी जवळपासच्या पोलिस स्टेशनला चौकशी केली असता एक तरुणी बेपत्ता असल्याचे कळाले. त्यांनी हा फोटो अरशदला दाखवला. अर्शदने वेळीच ही आपली बहिण असल्याचे ओळखले आणि भावूक झाला. अरशदच्या जबाबानंतर पोलिसांनी रॉकीचा शोध सुरू केला. तो त्यांना पानीपतमध्ये सापडला. सध्या रॉकी शर्मा कोर्टात सादर करण्यासाठी फिट नसल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत असे पोलिसांनी सांगितले आहे.


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...