आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • या तरुणीने 1000 जणांना प्रेमजालात गंडवले, प्रियकराचे कर्ज फेडायला मागितली खंडणी, केली हत्या Girl Is Stuck With A Thousand People

या तरुणीने 1000 जणांना प्रेमजालात गंडवले, प्रियकराचे कर्ज फेडायला मागितली खंडणी, केली हत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुनाची आरोपी प्रिया सेठ. तिच्या यापूर्वी 1000 हून जास्त जणांना ब्लॅकमेल केल्याचे गुन्हे दाखल आहेत. - Divya Marathi
खुनाची आरोपी प्रिया सेठ. तिच्या यापूर्वी 1000 हून जास्त जणांना ब्लॅकमेल केल्याचे गुन्हे दाखल आहेत.

जयपूर - एटीएमवर दरोडा, पीटा अॅक्ट आणि 1000 हून जास्त जणांना गंडवणे यासारखे असंख्य गुन्हे एका तरुणीवर दाखल आहेत. या तरुणीने आपल्या प्रियकरावरील कर्ज फेडण्यासाठी एका तरुणाशी आधी अवैध संबंध प्रस्थापित केले, मग त्याची अश्लील क्लिप शूट करून त्याला ब्लॅकमेल केले. पैशांची मागणीसाठी त्याचे अपहरणच केले, आणि शेवटी त्याची हत्या केली.

> प्रिया सेठ नावाच्या या महिला गँगस्टरने सोशल मीडियावर ओळख करून घेत तरुणाला मित्र बनवले. मग किडनॅप करून 10 लाख रुपयांची खंडणी त्याच्या घरच्यांना मागितली. तरुणाच्या वडिलांनी लागलीच 3 लाख रुपये खात्यात ट्रान्सफर केले. परंतु प्रियाने तसेच तिच्या दोन इतर साथीदारांनी मिळून त्या अपहृत तरुणाची हत्या केली. मृत दुष्यंत शर्मा हा बिल्डिंग मटेरियलचा व्यवसाय करायचा. 

> प्रकरणाच्या 10 तासांनंतर झोटवाड़ा पोलिसांनी कॉल डिटेल व मोबाइल लोकेशनच्या आधारे आरोपी तरुणी व तिच्या दोन साथीदारांना बजाजनगरच्या अनिता कॉलनी येथील ईडन गार्डन अपार्टमेंटमधून अटक केली.

> आरोपी तरुणी प्रिया सेठ आणि तिचा प्रियकर दीक्षांत कामरा व लक्ष्य वालिया गंगानगरचे रहिवासी आहेत. आरोपी प्रिया सेठ येथे दीक्षांतसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायची. आरोपी दीक्षांत मुंबईमध्ये मॉडेलिंग करायचा, त्याच्यावर कर्ज होते. यामुळे प्रिया सेठने दीक्षांतसोबत मिळून कर्ज फेडण्यासाठी दुष्यंतला किडनॅप करून खंडणी उकळण्याचा कट रचला. दुष्यंतच्या वडिलांनी बँक खात्यात 3 लाख जमा केले, परंतु हा सुटून पोलिसांत जाईल म्हणून तिघांनी दुष्यंतची हत्या करून त्याचा मृतदेह दिल्ली बायपासवर रस्त्याच्या कडेला एका सुटकेसमध्ये टाकून फेकून दिला.

 

असे आहे प्रकरण अन् तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळण्याची कहाणी

 

टिंडर अॅपवरून केला संपर्क, मग अवैध संबंध
> चौकशीत समोर आले की, हत्या झालेले दुष्यंत शर्मा बिल्डिंग मेटेरियलचा व्यापार करायचे. 3 महिन्यांपूर्वी दुष्यंतची प्रिया सेठशी टिंडर अॅपच्या माध्यमातून भेट झाली होती. तेव्हापासून त्यांच्या टिंडर अॅप आणि व्हॉट‌सअॅपच्या माध्यमातून कॉलिंग आणि मेसेजच्या माध्यमातून बातचीत होऊ लागली. यानंतर दुष्यंतचे प्रियाच्या फ्लॅटवर येणे-जाणे सुरू झाले. त्यांच्यात अवैध संबंध बनले आणि मग दुष्यंत हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकला. यादरम्यान प्रियाने आपल्या साथीदारांच्या मदतीने दुष्यंतसोबतचा अश्लील व्हिडिओ शूट केला.

 

रेप केसमध्ये अडकण्याची धमकी देऊन 10 लाखांची मागणी
> अॅडिशनल डीसीपी रतन सिंह म्हणाले की, बुधवारी रात्री दुष्यंत घरातून कार घेऊन निघाला होता. तो बजाजनगरातील प्रिया सेठच्या घरी पोहोचला. येथे कटानुसार प्रियाने दुष्यंतला ब्लॅकमेल करून रेप केसमध्ये फसवण्याची धमकी दिली. याबदल्यात दुष्यंतकडून 10 लाख रुपयांची मागणी केली. तेव्हा फ्लॅटवरील प्रिया आणि तिच्या कथित पती आरोपी दीक्षांतने रात्रभर दुष्यंतला टॉर्चर केले.

 

सकाळी वडिलांना किडनॅपिंगचा फोन, केली पैशांची मागणी
> गुरुवारी सकाळी 10 वाजता प्रिया आणि तिच्या साथीदारांनी दुष्यंतच्या मोबाइलवरून त्याच्या वडिलांना फोन केला. यात दुष्यंतने वडिलांना सांगितले की, त्याचे अपहरण झाले आहे. त्याला सोडण्याच्या बदल्यात 10 लाख रुपये मागत आहेत. तुम्ही माझ्या बँक खात्यात पैसे जमा करा.
> यावर वडिलांनी दुष्यंतच्या खात्यात तब्बल दीड लाख रुपये जमा केले. यानंतर प्रियाने दुष्यंतच्या वडिलांना फोनवर धमकी देऊन खंडणी मागितली. तेव्हा त्यांनी काही पैसे खात्यात जमा करत असल्याचे सांगितले. यानंतर लगेच त्यांनी पोलिसांत जाऊन तक्रार दिली.
> यानंतर एसीपी झोटवाड़ा आसमोहम्मद आणि गुरुभूपेंद्र सिंह यांच्या नेतृत्वातील पथकाने मोबाइल कॉलच्या लोकेशनवरून शोध घेण्याचा प्रयत्न केला. पोलिस बजाजनगरपर्यंत पोहोचले. परंतु अचूक लोकेशन मिळत नव्हते.

 

खात्यात पैसे जमा होताच केली हत्या, मग सूटकेसमध्ये कोंबला मृतदेह
> दुसरीकडे, गुरुवारी सकाळी खात्यात पैसे जमा झाल्यानंतर मोबाइलवर मेसेज आला. यानंतर प्रियाला भीती वाटली की, दुष्यंतला सोडल्यास तो पोलिसांत जाईल. यामुळे तिने हत्या करण्याचा निर्णय घेतला आणि आपले साथीदार दीक्षांतच्या मदतीने इलेक्ट्रिक केबलने दुष्यंतचा गळा आवळून खून केला.
> एवढेच करून ते थांबले नाहीत, धारदार हत्याराने दुष्यंतवर अनेक वारही केले. यानंतर त्यांचा तिसरा साथीदार लक्ष्यच्या मदतीने मृतदेह एका मोठ्या सुटकेसमध्ये बंद केला. यानंतर तिन्ही आरोपींनी दुष्यंतच्या कारच्या डिक्कीतच सुटकेस ठेवली. मग फ्लॅटला कुलूप लावून ते कारमधून रवाना झाले.

 

तोंडाला स्कार्फ गुंडाळून एटीएममधून काढले, मग मृतदेहाची लावली विल्हेवाट
> दुपारी अडीच वाजता प्रियाने लक्ष्मीमंदिर चौकातील एटीएममधून 20-20 हजार रुपये काढले. तेव्हा तिने तोंडाला स्कार्फ गुंडाळलेला होता. यानंतर दुपारी अडीच वाजता ते तिघेही कारने आमेर परिसरातील माता मंदिरजवळ गेले.
> तेथे रस्त्याच्या कडेला मृतदेह असलेली सुटकेस फेकून फरार झाले. दुसरीकडे, एटीएममधून पैसे काढताच पोलिस अधिकारी गुरुभूपेंद्र त्या बँकेत गेले. सीसीटीव्हीचे फुटेज पाहिले. परंतु तोंडाला स्कार्फ असल्याने त्यांना प्रिया ओळखू आली नाही.

 

दुष्यंतच्या मित्राकडून मिळाला सुगावा, मग पोलिसांच्या जाळ्यात अडकले आरोपी
> गुरुवारी संध्याकाळीच दुष्यंतचा एक मित्र पोलिसांना भेटला. त्याने सांगितले की, दुष्यंतचे एका महिलेच्या फ्लॅटवर येणे-जाणे होते. यावर झोटवाड़ा पोलिसांनी देवेंद्रच्या मित्रासोबत बजाजनगरातील प्रिया सेठच्या फ्लॅटवर धाव घेतली. तेथे फ्लॅटला कुलूप होते.
> साध्या गणवेशात पोलिस अधिकारी गुरुभूपेंद्र आणि त्यांचे पथक फ्लॅट मालक येण्याची वाट पाहू लागले. संध्याकाळी सात वाजता आरोपी प्रिया सेठ आणि दोन्ही आरोपी मृत दुष्यंतच्या कारने फ्लॅटवर पोहोचताच, पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन कडक चौकशी केली. आधी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी दुष्यंतची हत्या ते मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे गूढ उकलले.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या प्रकरणाचे आणखी फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...