आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रेनिंगमध्ये उडी मारायला घाबरत होती तरुणी, ट्रेनरने धक्का दिला अन् दगडावर आपटले डोके

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोईम्बतूर - तमिळनाडूमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे एक ट्रेनिंग तरुणीसाठी जीवघेणी ठरली आहे. ही घटना कोईम्बतूरच्या कोवाई कलाईमगल कॉलेजची आहे. याठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यासाठी मॉक ड्रिल सुरू होते. त्यावेळी ट्रेनरने काही जणांना दुसऱ्या मजल्यावरून उडी मारायला लागली. त्यावेळी एक तरुणी काहीशी घाबरलेली असल्याने उडी मारत नव्हती. त्यावेळी ट्रेनरने तिला धक्का दिला. खाली विद्यार्थी जाळी घेऊन उभे होते, पण तरुणी खाली पडली तेव्हा दुसऱ्या मजल्याच्या पडदी (सज्जा) ला धडकल्याने ही तरुणी थेट एका दगडावर जाऊन आपटली. त्यावेळी तिच्या डोक्याला जबर मार लागला आणि जागेवरच तिचा मृत्यू झाला. 

 

घटनेनंतर कॉलेजमध्ये एकच गोंधळ उडाला. विद्यार्थिनीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण काहीही फायदा झाला नाही. या प्रकरणी ट्रेनर आणि मुख्याध्यापकांची चौकशी केली जात आहे. पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यातही रेकॉर्ड झाली. 

 

बातम्या आणखी आहेत...