आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 महिने तरुणीला ठेवले डांबून, दररोज बलात्कार; आरोपीचे आईवडीलही द्यायचे पहारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीडितेने सांगितले, आरोपीचे आईवडीलही त्याला मदत करत होते. - Divya Marathi
पीडितेने सांगितले, आरोपीचे आईवडीलही त्याला मदत करत होते.

झांशी - यूपीच्या झांशीमध्ये एका तरुणीला 5 महिने डांबून बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. पीडितेने सांगितले की, जेव्हा तिने आरोपीला असे करण्यामागचे कारण विचारले तेव्हा तो म्हणाला की, तू मला प्रचंड आवडतेस म्हणून रेप केला. दुसरीकडे, पोलिसांत आपली आपबीती सांगताना पीडिता बेशुद्ध झाली. त्वरित तिला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी उपचार केल्यावर ती शुद्धीवर आली आणि तिथून डिस्चार्ज करण्यात आले.

 

रुमाल हुंगवून केले बेशुद्ध
- पीडितेने सांगितले की, 17 मे रोजी शेजारी राहणारी पुष्पा शिवहरे माझ्याकडे आली आणि म्हणाली, आमचे कुटुंब मुंबईत फिरायला जात आहे, तूही आमच्यासोबत चल. मी तिच्या बोलण्याला भुलले. आणि घरातून 90 हजार रुपये, 2 तोळे सोन्याचा हार आणि 1 तोळ्याचे मंगळसूत्र घेऊन त्यांच्यासोबत मुंबईला गेले.
- सर्वात आधीआम्ही झांशीच्या शिवाजीनगरमध्ये तिच्या एका नातेवाइकाकडे गेलो. यानंतर आम्ही सर्व जण एका खोलीत बसून चहा-नाष्टा करत होतो. यानंतर एकेक करून सर्व जण खोलीबाहेर गेले. शेवटी मी आणि आरोपी पवन शिवहरे खोलीत बसलेलो होतो. तेव्हा अचानक त्याने खोलीचा दरवाजा बंद केला.
- मी त्याला विचारले की, दार का बंद केलेस? तर तेव्हा त्याने आपल्या खिशातून एक रुमाल काढला आणि माझ्या तोंडावर लावला. मग मी बेशुद्ध झाले. दुसऱ्या दिवशी मला शुद्ध आली तेव्हा माझे कपडे उतरलेले होते आणि बाजूला आरोपी पवन होता.

 

आरोपी म्हणाला- तू मला आवडतेस
- मी त्याला या सर्वांचे कारण विचारल्यावर तो म्हणाला, तू मला आवडतेस, म्हणूनच मी रेप केला. त्याने माझे अश्लील फोटो आणि व्हिडिओही बनवले होते. धमकी द्यायचा की, जर विरोध केला तर सोशल मीडियावर व्हायरल करून टाकीन.
- यानंतर तो मला 2 दिवस बांधून रेप करत राहिला. तिसऱ्या दिवशी त्याचा नातेवाइक कन्हेय्या आणि त्याची पत्नी आले तेव्हा मी त्यांना मला सोडवा म्हणून विनंती केली. यावर ते म्हणाले, पवन जसे म्हणतोय, तसे कर, नाहीतर जिवंत राहणार नाहीस.

 

आरोपीचे आई-वडील द्यायचे पहारा
- चौथ्या दिवशी पुन्हा औषध खाऊ घालून बेशुद्ध केले. जाग आल्यावर मी पवनच्या जालौन येथील घरात होते. येथे त्याने 5 महिने बांधून माझ्यावर अत्याचार केले. दररोज मला रेप सहन करावा लागला. मी कुठेही पळून जाऊ नये म्हणून पवनचे आईवडील पहारा द्यायचे.
- एका दिवशी मला कुणाचा तरी मोबाइल आढळला, मग मी माझ्या घरच्यांना फोन करून सर्व माहिती दिली. यानंतर कुटुंबीयांनी येऊन मला त्यांच्या तावडीतून सोडवले. त्याने सोडताना पुन्हा माझ्या घरच्यांना धमकी दिली. ही घटना कुणाला सांगाल तर हिचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करून टाकीन.

 

काय म्हणतात पोलिस?
- एसपी सिटी देवेश कुमार पांडे म्हणाले, हे प्रकरण खूप गंभीर आहे. पीडितेची तक्रार नोंदवली असून, आरोपी फरार झाले आहेत. त्यांचा शोध घेऊन निश्चितच कारवाई केली जाईल.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...