आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आसाराम खटल्याचा आज निकाल; तीन राज्यांत अलर्ट, जोधपूर तुरुंगात उभारणार कोर्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर - येथील तुरुंगात उभारण्यात आलेले न्यायालय बलात्कारप्रकरणी आसाराम बापूविरुद्धच्या खटल्याचा निकाल बुधवारी जाहीर करणार आहे. २१ ऑगस्ट २०१३ रोजी दिल्लीत एका अल्पवयीन मुलीने आसाराम बापूविरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार दिली होती. ३१ सप्टेंबरला इंदूरमधून त्यांना अटक झाली. या खटल्यात आसाराम यांचे सहकारी शिवा, शरतचंद्र, शिल्पी व प्रकाश हे पण आरोपी आहेत. या प्रकरणी १० वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर राजस्थान, गुजरात आणि हरियाणात हाय अलर्ट देण्यात आला आहे.

 

१६९६ दिवसांपासून बापू तुरुंगात
* पीडित मुलीने ९४ पानी जबाब दिला.
* बापूंचा जामीन १२ वेळा फेटाळला गेला.
* ५८ पैकी ४४ साक्षी नोंदवल्या गेल्या. 
* पीडितेच्या वतीने १०७ कागदपत्रे दाखल.

 

पीडितेच्या घरून...
शहाजहानपूर - उत्तर प्रदेशातील शहाजहानपूरमध्ये पीडितेच्या घरी शांतता आहे. घराबाहेर २ पोलिस होते. आता महिला पोलिसही तैनात करण्यात आली. पाेलिस बाहेरच्या कुणालाही घरात जाऊ देत नाहीत. शहरात आसाराम समर्थक असल्याचा त्यांना संशय आहे. घरात जाण्यासाठी पीडितेच्या वडिलांची मंजुरी लागते. प्रशासनाने पीडितेच्या भावाला दोन दिवसांपूर्वी बंदुकीचा परवाना दिला आहे. आता फक्त निकालाची प्रतीक्षा आहे. 


पीडितेच्या आई-वडिलांच्या शब्दांत...
सा डेचार वर्षांपासून आमच्या कुटंुबाचे दिवस कैदेतच जात आहेत. या वर्षांबाबत आम्ही काय सांगावे? माझी मुलगी बाहेरच्या कुणाशीही बोलत नाही. मीही दिवसभर स्वत:ला कामाला जुंपून घेते. आधीसारखे आम्ही घराबाहेर हिंडू-फिरू शकत नाही. २४ तास सुरक्षेत राहावे लागते. सर्वसामान्यांसारखे जगणे नाहीच. आमचे घर हेच तुरुंग वाटते. लेकीने साडेचार वर्षांपासून साधा मोबाइलही वापरला नाही. ती घराबाहेर पडू शकत नसेल तर माेबाइल तरी काय वापरणार? तिला फार त्रास होतो, काय सांगावे? लवकरात लवकरच या प्रकरणापासून मुक्ती मिळावी, हिच इच्छा आहे.

 

माझ्या मुलाला तर नेहमीच धमक्या येत असतात. आम्ही पिता-पुत्र घराबाहेर असतो तेव्हा मनात एक भीती असते. लोक म्हणतात, निकालानंतर माझी मुलगी नव्या आयुष्याला सुरुवात करेल. पण मी म्हणतो आता ती काय सुरुवात करेल? आपल्या आयुष्यात इतके माघारल्यानंतर आता पुढे कसे जाता येईल? तरीही प्रयत्न करू. या दरम्यान बऱ्याच घटना घडल्या. काय काय सांगाव्या? आता आम्ही त्या विसरू इच्छितो. त्या आठवल्या की पुन्हा टेन्शन येते. निकाल आमच्या बाजूने लागला तरी काय होईल? आमच्या विचारांमुळे काही होत नाही. त्याने काहीही बदलणार नाही. आता देवाचीच साथ आहे. असाच विचार करून जगत आहोत. 


पीडितेच्या आई-वडिलांचे मनोगत, 
शब्दांकन : रवी श्रीवास्तव

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, पीडितेच्या घराबाहेर तैनात पोलिस...

 

हेही वाचा,
असा होता आसारामच्या अटकेचा थरार, पोलिसांची एवढी झाली होती दमछाक

बातम्या आणखी आहेत...